खळबळजनक! पती-पत्नीचे कार्यालयात मृतदेह, घरात दोन मुलींचाही आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 21:45 IST2021-12-03T21:45:16+5:302021-12-03T21:45:56+5:30

Suicide Case : आत्महत्या केलेल्या कुटुंबप्रमुखाचे विशाल मिश्रा असं नाव आहे. ते ऑनलाईन बॅटरीचा व्यवसाय करायचे. आज सकाळी त्यांच्या कार्यालयात एक कर्मचारी नियमित कामासाठी दाखल झाला तेव्हा त्यांचा मृतदेह पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला.

Husband and wife's body in office, two girls' suicide attempt at home | खळबळजनक! पती-पत्नीचे कार्यालयात मृतदेह, घरात दोन मुलींचाही आत्महत्येचा प्रयत्न

खळबळजनक! पती-पत्नीचे कार्यालयात मृतदेह, घरात दोन मुलींचाही आत्महत्येचा प्रयत्न

लखनऊ -  उत्तर प्रदेशच्या आग्रा शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत धक्कादायक गोष्ट म्हणजे फक्त एका व्यक्तीने आत्महत्या केलेली नाही तर चार जणांनी सामूहिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यातील तिघांचा मृत्यू झाला आहे. तर कुटुंबातील मोठ्या मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.


आग्राच्या बंशी विहार कॉलनीत वास्तव्यास असलेल्या एका कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केल्याची माहिती उघड झाली आहे. कुटुंबातील पती-पत्नीचा मृत्यू झाला आहे. तसेच या दाम्पत्याच्या लहान मुलीचा सुद्धा मृत्यू झाला आहे. तसेच मोठ्या मुलीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या कुटुंबाने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं याचं कारण समजू शकलेलं नाही. पोलिसांना मृतक व्यक्तीच्या कार्यालयात त्याच्या मृतदेहाजवळ सुसाईड नोट सापडली आहे. मात्र, त्यातून काही स्पष्ट होत नाही. या सगळ्या घटनेला आम्हीच जबाबदार आहोत, असं त्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. 

मृतदेहाजवळ सापडलेल्या सुसाईड नोटवर पोलिसांना संशय आला. त्यामुळे ते ताबडतोब त्यांच्या बंशी विहार कॉलनीत त्यांच्या घरी तपासासाठी गेले. तिथे पोहोचल्यानंतर पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली. कारण घरात मिश्रा दाम्पत्याच्या दोन्ही मुली बेशुद्ध  पडल्या होत्या. पोलिसांनी तातडीने दोन्ही मुलींना जवळील रुग्णालयात नेलं. पण तिथे गेल्यावर डॉक्टरांनी लहान मुलगी काव्याचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलं. तसेच मोठ्या मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मिश्रा कुटुंबाच्या नातेवाईकांना या घटनेची माहिती देण्यात आली असून सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. पोलीस, डॉग स्क्वाड आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळाची पाहणी करत आहे.

आत्महत्या केलेल्या कुटुंबप्रमुखाचे विशाल मिश्रा असं नाव आहे. ते ऑनलाईन बॅटरीचा व्यवसाय करायचे. आज सकाळी त्यांच्या कार्यालयात एक कर्मचारी नियमित कामासाठी दाखल झाला तेव्हा त्यांचा मृतदेह पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. तसेच त्याच ऑफिसमध्ये त्यांच्या पत्नी प्रचिती यांचा जमिनीवर मृतदेह पडलेला आढळला. हे सगळं दृश्य पाहून कर्मचारी घाबरला. त्याने तातडीने सिंकदरा पोलिसांना माहिती कळविली.

 

Web Title: Husband and wife's body in office, two girls' suicide attempt at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.