Pradeep Sharma...अन् असा झाला एन्काउंटर स्पेशालिस्टच्या अटकेचा ‘गेम’

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 07:27 AM2021-06-18T07:27:10+5:302021-06-18T07:27:31+5:30

pradeep sharma arrest: पंटरच्या अटकेनंतर सापडले सबळ पुरावे; प्रदीप शर्माला लाेणावळ्यातून अटक

... This is how the 'game' of the encounter specialist's pradeep sharma arrest | Pradeep Sharma...अन् असा झाला एन्काउंटर स्पेशालिस्टच्या अटकेचा ‘गेम’

Pradeep Sharma...अन् असा झाला एन्काउंटर स्पेशालिस्टच्या अटकेचा ‘गेम’

Next

- जमीर काझी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ॲण्टेलिया स्फोटक कार व मनसुख हिरेन हत्येशी संबंधित एनआयएची कारवाई टाळण्यात यापूर्वी दाेनवेळा एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यशस्वी ठरला होता. मात्र, गेल्या आठवड्यात त्याचे पंटर म्हणून काम करणारे दोघेजण सापडल्यानंतर शर्माविरुद्ध सबळ पुरावे तपास यंत्रणेच्या हाती लागले. त्यामुळे कारवाईच्या भीतीने लोणावळ्यात जाऊन तेथून अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी शर्माचे प्रयत्न सुरू हाेते. मात्र, त्यापूर्वीच पथकाने तेथे धाड टाकून अटकेचा ‘गेम’ यशस्वी केला.

ठाण्यातील व्यावसायिक मनसुखच्या हत्येचा कट तसेच त्यासाठी जागा निश्चिती व पैसे देण्यामध्ये शर्माचा थेट सहभाग असल्याचे पुरावे सापडल्याचा अधिकाऱ्यांचा दावा आहे. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी एनआयएच्या पथकाने बुधवारपासूनच फिल्डिंग लावली होती. मंगळवारी रात्री तपास अधिकाऱ्यांचे एक पथक लोणावळ्याला रवाना झाले हाेते, 
तर काहीजण त्याच्या अंधेरीतील फ्लॅट आणि कार्यालयावर पाळत ठेवून होते. त्यासाठी पथकाने विशेष खबरदारी घेतली होती. अधीक्षक विक्रम खराटे यांच्या नेतृत्वाखालील तीन स्वतंत्र पथकांनी ही मोहीम यशस्वी केली.

मनसुख हत्या प्रकरणात निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझे व विनायक शिंदेला अटक केल्यानंतर त्यांच्याकडील चौकशीतून प्रदीप शर्माचे नाव पुढे आले. त्यामुळे मार्च व एप्रिलमध्ये त्याच्याकडे दोनदा कसून चौकशी करण्यात आली. मात्र, त्याने आरोप फेटाळले होते. दरम्यान, एनआयएने मालाडमधून जप्त केलेल्या लाल रंगाच्या तवेरा गाडीच्या मालकाचा शोध घेतला असता, ती आशिष जाधव याच्या मालकीची निघाली. तो आणि संतोष लोहारच्या अटकेनंतर हे दोघेजण शर्मासाठी खबऱ्याचे काम करत असल्याचे समाेर आले. शर्मा ठाण्यात खंडणीविरोधी पथकात कार्यरत असताना अनेक प्रकरणात त्याच्या सांगण्यावरून ते ‘कलेक्शन’चे काम करत होते. त्यांच्यावर विश्वास असल्याने 
दोघांना त्याने आपल्या पी. एस. फाऊंडेशनच्या कामात सक्रिय ठेवले होते. मनसुखच्या हत्येसाठी शर्माच्या सांगण्यावरून तवेरा गाडी घेऊन ते रेतीबंदर येथे गेले हाेते. त्यासाठी 
शर्माने पैसे दिल्याची कबुली त्यांनी दिल्याने तपास अधिकाऱ्यांनी शर्माला अटक करण्याचे ठरवले. त्याची कुणकूण लागल्याने तो दोन दिवसांपूर्वी मुंबईतून निघून गेला 
होता.
लोणावळ्यात एका रिसॉर्टवर शर्मा थांबला असल्याचे समजल्यानंतर पाचजणांचे पथक रात्रीच तिकडे पाठविण्यात आले. सकाळी सहा वाजता त्याला ताब्यात घेऊन पथक मुंबईकडे रवाना झाले, त्याचवेळी त्याच्या अंधेरीतील घर व कार्यालयाची झडती सुरू करण्यात आली. त्यासाठी मुंबई पोलिसांकडून बंदोबस्तही घेण्यात आला होता.

परमबीर सिंग यांच्या विश्वासातले अधिकारी 
या प्रकरणात एनआयएने तत्कालीन आयुक्त परमबीर सिंग यांचा एकदाच जबाब घेतला आहे. परंतु, सचिन वाझे व प्रदीप शर्मा हे त्यांचे अत्यंत विश्वासू अधिकारी होते, हे सर्वश्रुत आहे. सिंग ठाण्याचे आयुक्त असताना त्यांनीच शर्माला खंडणीविरोधी पथकाचे प्रमुख नेमले होते. त्यामुळे त्याला अटक झाल्याने परमबीर सिंग यांच्या अडचणी वाढणार आहेत, त्यांच्याकडे पुन्हा चौकशी केली जाण्याची शक्यता असल्याचे सुत्रांनी सांगितले.

कोण आहे प्रदीप शर्मा ?
nमहाराष्ट्र पोलीस दलात १९८३ला उपनिरीक्षक म्हणून भरती झालेल्या प्रदीप शर्मा यांनी १९९०च्या दशकात १२३ एन्काऊंटर केले. त्यामुळे त्यांची ओळख एन्काऊंटर स्पेशलिस्ट अशी बनली होती.
nनेहमी वादग्रस्त राहिल्याने त्याची खातेनिहाय चौकशी होऊन २००८मध्ये त्याला निलंबित केले होते.
nलखन भैया बनावट एन्काऊंटर प्रकरणात २०१०मध्ये त्याला अटक झाली. त्यानंतर तीन वर्षांनी सुटका झाली हाेती.
n२०१७मध्ये त्यांना पुन्हा खात्यात घेण्यात आले. त्यानंतर ठाण्याचे खंडणीविरोधी पथकाचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली.

२०१९मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेऊन त्यांनी शिवसेनेच्यावतीने नालासोपारा विधानसभा निवडणूक लढवली. मात्र, त्यांना पराभव पत्करावा लागला.

Web Title: ... This is how the 'game' of the encounter specialist's pradeep sharma arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.