House Breaking session in Nashik; A loot of Rs 15 lakh was looted | नाशकात घरफोडयांचे सत्र; सव्वा लाख रुपयांचा ऐवज लुटला

नाशकात घरफोडयांचे सत्र; सव्वा लाख रुपयांचा ऐवज लुटला

ठळक मुद्दे घरफोडीबाबत माता पार्वती निवास येथे राहणाऱ्या हरिभाऊ राजाराम गोतरणे यांनी तक्रार दाखल केली आहे.

नाशिक : म्हसरूळ शिवारातील मखमलाबाद रोडवरील उदयनगर येथिल बंद बंगल्याचा दरवाजाचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरातील बेडरूममध्ये ठेवलेल्या कपाटातून सोन्याचांदीचे दागिने तसेच तेवीस हजार रुपयांची रोकड असा सव्वा लाख रुपयांचा ऐवज चोरून घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या मंगळवार ते गुरुवार या कालावधीत घरफोडीच्या घटना घडली. घरफोडीबाबत माता पार्वती निवास येथे राहणाऱ्या हरिभाऊ राजाराम गोतरणे यांनी तक्रार दाखल केली आहे. तीन ते चार दिवसांपूर्वी गोतरणे हे निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथे पत्नी व मुलींना आणण्यासाठी गेले होते त्याच दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या उदयनगर येथे असलेल्या माता पार्वती या बंगल्याच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश करत घरातील कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने तसेच 23 हजार रुपयांची रोकड असा सुमारे सव्वा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला गोतरने घरी परतला असता त्यांच्या बंगल्याचा मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तोडलेला दिसला व दरवाजा उघडा असल्याचे निदर्शनास आले त्यानंतर त्यांनी घरात प्रवेश केला असता बेडरूममधील साहित्य जमिनीवर अस्ताव्यस्त पडलेले होते तसेच सोन्या-चांदीचे दागिने जागेवर नसल्याचे आढळून आल्याने घरफोडी झाल्याचे मह्या त्याचा त्यांनी पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

Sushant Singh Rajput Suicide : ईडीच्या हाती लागला पुरावा, आता होऊ शकते संदीप सिंगची चौकशी 

 

Sushant Singh Rajput Suicide : संजय राऊत, मुंबई पोलीस आयुक्तांविरोधात तक्रार, पाटणा पोलिसांकडे अटकेची मागणी 

 

सुशांतच्या कुटुंबीयांना शांत बसावं आणि मुंबई पोलिसांना सहकार्य करावं: संजय राऊत

 

डॉ.पायलच्या आत्महत्येतील संशयितांना इतर महाविद्यालयात प्रवेश नको

 

सुरज पांचोलीने सुशांत प्रकरणाची CBI चौकशीची मागणी केली अन् म्हणाला मैं दुआ करता हूं कि उनके परिवार को...

 

Video : देव तारी त्याला कोण मारी! कारने फरफटत नेऊनही महिला बचावली, रुग्णालयात उपचार सुरु 

 

स्वातंत्र्यदिनी दिल्या जाणाऱ्या पोलीस पदके केंद्राकडून जाहीर

 

एक अधिकाऱ्यासह 13 पोलीस कर्मचाऱ्यांना शौर्य पदक

Web Title: House Breaking session in Nashik; A loot of Rs 15 lakh was looted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.