मुलींच्या बाथरूममध्ये SPY कॅमेरा लावून VIDEO रेकॉर्ड करायचे, हॉस्टेल चालकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 17:55 IST2022-06-02T16:34:17+5:302022-06-02T17:55:46+5:30
SPY Camera : बाथरूमच्या शॉवरमधून कॅमेरे आणि इतर उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.

मुलींच्या बाथरूममध्ये SPY कॅमेरा लावून VIDEO रेकॉर्ड करायचे, हॉस्टेल चालकाला अटक
प्रयागराज : संगमनगरी प्रयागराजच्या मुलींच्या वसतिगृहात एक अत्यंत लाजिरवाणी घटना समोर आली आहे. प्रयागराज गर्ल्स हॉस्टेलच्या वॉश रूममध्ये स्काय कॅमेरा सापडला आहे. हा प्रकार मुलींना समजताच त्यांनी एकच गोंधळ घातला. हा कॅमेरा हॉस्टेल ऑपरेटरने बसवला होता. तक्रारीच्या आधारे वसतिगृह संचालक आशिष खरे याला अटक करण्यात आली आहे. बाथरूमच्या शॉवरमधून कॅमेरे आणि इतर उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.
विद्यार्थिनींची तक्रार, वसतिगृह चालकाला अटक
हे वसतिगृह मायोहाळ चौकाजवळ राहणारे आशिष खरे मुलींच्या वसतिगृहाचा संचालक आहेत. कॅमेरा बसवण्याचा कारनामा समोर आल्यानंतर पोलिसांनी मुलींचे वसतिगृह संचालक आशिष खरे याला रंगेहाथ पकडले. त्याला कर्नलगंज पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलिसांच्या चौकशीत असे समोर आले आहे की, आरोपी हॉस्टेल ऑपरेटरने तो विद्यार्थिनींचे व्हिडिओ बनवायचा, असे सांगितले. या व्हिडिओंसोबत तो काय करत होता, याचे उत्तर तो पोलिसांना देत नाहीय.
'गे असल्याचा व्हिडीओ व्हायरल करेन'; शरीरसुखाचं आमिष दाखवून MBAच्या विद्यार्थ्याला लुटलं
साकीनाका बलात्कार प्रकरणी मोहन चौहानला फाशीची शिक्षा, सत्र न्यायालयाचा निकाल
तो अत्यल्प पैशात विद्यार्थिनींना खोल्या भाड्याने देत असे, असे समोर आले आहे. गुरुवारी दुपारी वसतिगृहात राहणाऱ्या काही विद्यार्थिनींनी कर्नलगंज पोलीस ठाण्यात जाऊन बाथरूममध्ये स्पाय कॅमेरा असल्याचे सांगत पोलिसांत तक्रार केली. हा कॅमेरा शॉवरमध्ये बसवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वसतिगृह चालक हा डॉक्टरचा मुलगा आहे. पोलीस त्याची चौकशी करत आहेत. चौकशीनंतर इतर अनेक गोष्टींसह काही लोकांची नावेही बाहेर येण्याची शक्यता पोलिसांना आहे.