संशयामुळे क्रूर अंत! ऑफिसमध्येच प्रेयसीचे तुकडे केले; १०० CCTV अन् स्कूटीवरून धड फिरवणाऱ्याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 11:55 IST2026-01-26T11:48:01+5:302026-01-26T11:55:44+5:30

प्रेमसंबंधातील संशयातून आग्र्यात एका तरुणीने महिलेची निर्घृणपणे हत्या केली.

Horror in Agra Man Beheads Girlfriend Over Suspicion Carries Body on Her Own Scooter Arrested After CCTV Probe | संशयामुळे क्रूर अंत! ऑफिसमध्येच प्रेयसीचे तुकडे केले; १०० CCTV अन् स्कूटीवरून धड फिरवणाऱ्याला अटक

संशयामुळे क्रूर अंत! ऑफिसमध्येच प्रेयसीचे तुकडे केले; १०० CCTV अन् स्कूटीवरून धड फिरवणाऱ्याला अटक

Delhi Crime: माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत भीषण घटना आग्र्यातील ट्रान्स यमुना परिसरातून समोर आली आहे. प्रेमसंबंधातील संशयातून एका नराधम प्रियकराने आपल्या प्रेयसीची निर्घृण हत्या केली. त्याने केवळ हत्याच केली नाही, तर मृतदेहाचे शीर आणि पाय कापून धड पोत्यात भरले आणि तिच्याच स्कूटीवरून हे धड शहरात विल्हेवाट लावण्यासाठी फिरवत राहिला. या थरारक हत्याकांडाचा खुलासा पोलिसांनी १०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची फुटेज तपासून अवघ्या काही तासांत केला आहे.

२३ जानेवारी रोजी ही घटना घडली. मृत युवती आणि आरोपी विनय हे एकाच ऑफिसमध्ये काम करत होते. विनयचा असा संशय होता की, युवतीचे इतर कोणाशी तरी प्रेमसंबंध आहेत. याच वादातून त्याने तिला २३ जानेवारी रोजी ऑफिसमध्ये बोलावले. तिथे दोघांमध्ये जोरदार भांडण झाले आणि रागाच्या भरात विनयने चाकूने तिचे गळा चिरून हत्या केली.

शीर वेगळे करून नाल्यात फेकले

हत्या केल्यानंतर विनयने पुरावा नष्ट करण्यासाठी अत्यंत क्रूर पाऊल उचलले. त्याने मृतदेहाचे शीर आणि पाय कापून वेगळे केले. धड एका पोत्यात भरले आणि डोके एका नाल्यात फेकून दिले. धक्कादायक बाब म्हणजे, त्याने ते रक्ताने माखलेले पोते मृत युवतीच्याच स्कूटीवर लादले आणि रात्रीच्या अंधारात तो सुमारे २ किलोमीटरपर्यंत फिरत राहिला. शेवटी यमुना पुलावरून त्याने धड खाली फेकून दिले.

पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

युवती रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. आरोपी विनय इतका चालाख होता की, तो स्वतः नातेवाईकांसोबत पोलीस ठाण्यात गेला आणि तिला शोधण्याचे नाटक करत राहिला. जेणेकरून पोलिसांना त्याच्यावर संशय येऊ नये.

१०० सीसीटीव्ही आणि १२ तासांत अटक

डीसीपी सिटी सय्यद अली अब्बास यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी चार पथके तयार केली होती. हायवे आणि कॉलनीमधील १०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासल्यानंतर एका फुटेजमध्ये विनय स्कूटीवर संशयास्पद पोते घेऊन जाताना दिसला. स्कूटीच्या नंबरवरून पोलिसांनी त्याचा माग काढला आणि १२ तासांच्या आत त्याला बेड्या ठोकल्या.

तपास अजूनही सुरू

पोलिसांनी मृतदेहाचे धड जप्त केले आहे, मात्र अद्याप मृत युवतीचे शीर सापडलेले नाही. पोलीस आणि गोताखोरांच्या मदतीने नाल्यात आणि आसपासच्या परिसरात शिराचा शोध घेतला जात आहे. आरोपीने आपला गुन्हा कबूल केला असून, त्याच्यावर हत्येचा आणि पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title : आगरा: ईर्ष्यालु प्रेमी ने की प्रेमिका की हत्या, CCTV से गिरफ्तारी

Web Summary : आगरा में एक व्यक्ति ने अवैध संबंध के शक में अपनी प्रेमिका की हत्या कर दी। उसने शव के टुकड़े कर स्कूटर पर ठिकाने लगाए। पुलिस ने सीसीटीवी फुटेज से उसे गिरफ्तार किया। उसने अपराध कबूल कर लिया।

Web Title : Jealous Lover Murders, Chops Girlfriend in Agra; Arrested Via CCTV

Web Summary : In Agra, a man murdered his girlfriend, suspecting infidelity. He dismembered her body, transporting it on her scooter to dispose of it. Police used CCTV footage to quickly arrest him. He confessed to the crime.