भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 17:21 IST2025-08-27T17:16:29+5:302025-08-27T17:21:05+5:30
Crime news Marathi: बिहारची राजधानी पाटणा येथील एका शाळेत पाचवीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केली. या प्रकरणात तिच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहेत.

भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
School Student Suicide News: पाटणातील एका सरकारी शाळेत शिकणाऱ्या पाचवीतील विद्यार्थिनीने स्वतःला पेटवून घेतले. विद्यार्थीनी टॉयलेटमध्ये गेली आणि तिने स्वतःला पेटवून घेतले. पेटवून घेतल्यानंतर काही क्षणातच ती बाहेर आली. आग विझवून तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती शहरात पसरताच लोकांनी शाळेबाहेर गर्दी केली. संतप्त नागरिकांनी शाळेत घुसून तोडफोड करत आग लावण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि लोकांनामध्ये झटापटही झाली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दरम्यान, मयत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी या प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत. तिच्यावर अत्याचार झाला असावा. तिची यापूर्वीही छेड काढण्यात आली होती. शाळेच्या परिसरात नशा करणारे असतात. कुणीतरी तिला जाळले आहे, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
टॉयलेटमध्ये मिळाला रॉकेलचा डब्बा
ज्या टॉयलेटमध्ये विद्यार्थिनीने स्वतःला पेटवून घेतले, तिथे रॉकेटलचा डब्बा मिळाला आहे. चितकोहरा कन्या शाळेत ही घटना बुधवारी सकाळी घडली.
१२ वर्षीय विद्यार्थिनी टॉयलेटमध्ये गेली आणि तिने स्वतःला पेटवून घेतले. त्यानंतर पेटलेल्या अवस्थेत बाहेर आली. तिला तातडीने शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. पण, ती ९० टक्के भाजली होती. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तिने आत्महत्या का केली याचा शोध घेतला जात आहे. शाळेच्या प्राचार्याचीही चौकशी केली जात आहे, असे पोलिसांनी सांगितले.
शाळेत तोडफोड, जाळपोळ
घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोकांची परिसरात मोठी गर्दी झाली. शाळेविरोधात घोषणा देत लोक शाळेत घुसले. खुर्च्या टेबल यांची लोकांनी तोडफोड केली. शाळेत आग लावण्याचाही प्रयत्न केला गेला. यावेळी पोलीस आणि लोकांमध्ये झटापट झाली. यात काही पोलीस जखमी झाले आहेत.
पटना के एक गर्ल्स स्कूल में बुधवार को अफरा-तफरी मच गई। कक्षा 5 की एक छात्रा ने बाथरूम में खुद को आग लगा ली, ऐसा कहा जा रहा है। परिजनों ने इसे खारिज किया है। ये घटना गर्दनीबाग थाना क्षेत्र के आमला टोला कन्या विद्यालय में हुई। इसके बाद लोगों ने पुलिस पर गुस्सा उतार दिया।#Patnapic.twitter.com/zBXcEr6kV2
— NBT Bihar (@NBTBihar) August 27, 2025
मुलगी मागील ४ ते ५ दिवस शाळेत आलेली नव्हती. बुधवारी ती शाळेत आली. प्रार्थनेसाठी विद्यार्थी जमलेले असतानाच ती टॉयलेटमध्ये गेली आणि पेटवून घेतलं असेही पोलिसांनी सांगितले.