खळबळजनक! गृहमंत्री अमित शाह यांच्या सुरक्षा रक्षकाचे अपहरण करून केली लूटमार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 14:09 IST2020-06-09T14:04:35+5:302020-06-09T14:09:50+5:30
रात्री उशिरा तीन चोरट्यांनी ही घटना घडवून आणली आणि सुरक्षा कर्मचार्यांना मारहाण करून त्यांची गाडी लुटली. गुन्हा नोंदवून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

खळबळजनक! गृहमंत्री अमित शाह यांच्या सुरक्षा रक्षकाचे अपहरण करून केली लूटमार
गुरुग्राममध्ये गृहमंत्री अमित शाह यांच्या सुरक्षा कर्मचार्यांचे अपहरण करून त्याला लुटल्याची घटना घडली आहे. त्यामुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. रात्री उशिरा तीन चोरट्यांनी ही घटना घडवून आणली आणि सुरक्षा कर्मचार्यांना मारहाण करून त्यांची गाडी लुटली. गुन्हा नोंदवून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कॉन्स्टेबल ऋषिपाल हे गृहमंत्री अमित शहा यांच्या सुरक्षेखातर पोलीस ताफ्यात तैनात आहेत. सोमवारी रात्री ते आपल्या ब्रेजा कारमध्ये ड्युटीसाठी आपल्या कोसली (रेवाडी) येथून दिल्लीकडे जात होते.
गृहमंत्री अमित शाह यांच्या सुरक्षा रक्षकाचे अपहरण करून केली लूटमार https://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) June 9, 2020
पटौदी परिसरात तीन अज्ञातांनी कॉन्स्टेबल ऋषिपालवर हल्ला करुन त्याचे अपहरण केले. नंतर, तिघांनी त्या कॉन्स्टेबलला सोडले आणि त्याची गाडी लुटल्यानंतर फरार झाले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या :
नवऱ्याच्या गर्भवती प्रेयसीला घराबाहेर बोलावलं अन् गोळीच झाडली... व्हिडीओ व्हायरल
धक्कादायक! अनुकंपा नोकरी मिळविण्यासाठी पित्याला ठार मारले; आई, भावाचीही मदत
लॉकडाऊन दरम्यान स्पा सेंटरच्या नावाखाली चालवले जात होते सेक्स रॅकेट
चोरांनी दिलं पोलिसांना खुलं आव्हान; फिल्मी स्टाईलनं सांगितली चोरीची वेळ अन् तारीख
युद्ध आमुचे सुरू... जम्मू-काश्मीरमध्ये सहा महिन्यात 93 दहशतवाद्यांना कंठस्नान