नवऱ्याच्या गर्भवती प्रेयसीला घराबाहेर बोलावलं अन् गोळीच झाडली... व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 01:25 PM2020-06-09T13:25:34+5:302020-06-09T13:29:20+5:30

आश्चर्याची गोष्ट म्हणजे आरोपी महिला यू ट्यूबवरून बंदूक चालविण्यास शिकली.

Husband's pregnant girlfriend called out of the house and shoot out ... Video get Viral | नवऱ्याच्या गर्भवती प्रेयसीला घराबाहेर बोलावलं अन् गोळीच झाडली... व्हिडीओ व्हायरल

नवऱ्याच्या गर्भवती प्रेयसीला घराबाहेर बोलावलं अन् गोळीच झाडली... व्हिडीओ व्हायरल

googlenewsNext
ठळक मुद्देही घटना सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशन परिसरातील आहे. पोलिसांनी सांगितले की, विद्यानगर येथील रहिवासी मोहम्मद जफरने शबानाशी लग्न केले. त्याला पाच मुले आहेत. आलियाची अनेक नावे होती. लोक तिला पिंकी शर्मा, मानसी शर्मा, श्वेता भारद्वाज, मंगल म्हणून ओळखतात. ती बिजनौरमधील नूरपूरची रहिवासी होती. शबानाला आलियाचं घर सापडलं. ती तिच्या घरी पोहोचली. तिला घराबाहेर बोलावले आणि आलियावर चार गोळ्या झाडल्या.

मुरादाबाद - उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने घराबाहेर तिच्या नवऱ्याच्या प्रेयसीला बोलावून गोळ्या झाडल्या. नवऱ्याच्या प्रेयसीला गोळ्या झाडल्यानंतर ती रिव्हॉल्व्हर घेऊन त्याच परिसरात फिरत होती. जखमी महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तिचा मृत्यू झाला. मृत महिला सात महिन्यांची गरोदर होती. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आरोपी महिला यू ट्यूबवरून बंदूक चालविण्यास शिकली.

ही घटना सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशन परिसरातील आहे. पोलिसांनी सांगितले की, विद्यानगर येथील रहिवासी मोहम्मद जफरने शबानाशी लग्न केले. त्याला पाच मुले आहेत. दीड वर्षापासून शबानाला समजले की, तिच्या पतीचा दुसर्‍या एका महिलेबरोबर अवैध संबंध आहे.

आलिया गर्भवती होती
शबानाने मोहम्मद जफरला अनेकदा महिलेबरोबरचे अवैध संबंध तोडण्यास सांगितले होते. परंतु त्याने ते जुमानले नाही. नुकतेच तिला कळले की, आलिया ही महिला गर्भवती आहे. यानंतर शबाना हतबल झाला.

युट्यूबवरून बंदूक कशी चालवायची हे शिकले
पोलीस चौकशीदरम्यान शबाना म्हणाली की, पूर्वी तिच्या घरात चोरी झाली होती, त्यानंतर पतीने तिला रिव्हॉल्व्हर घेऊन दिली होती. आलियाला ठार मारण्यासाठी शबानाने यू ट्यूबवर बंदूक कशी चालवायची हे शिकली. त्यानंतर ती काही दिवसांपासून बंदूक चालविण्यास घरी सराव करत होती. 


तिच्यावर छातीवर चार गोळ्या झाडल्या
शबानाला आलियाचं घर सापडलं. ती तिच्या घरी पोहोचली. तिला घराबाहेर बोलावले आणि आलियावर चार गोळ्या झाडल्या. गोळ्या झाडल्यानंतर, ती बंदुक घेऊन पायीच परिसरात फिरत होती. 

आलियाची बरीच नावे होती
माहिती मिळताच घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी शबानाला अटक केली. पोलिसांनी सांगितले की, आलियाची अनेक नावे होती. लोक तिला पिंकी शर्मा, मानसी शर्मा, श्वेता भारद्वाज, मंगल म्हणून ओळखतात. ती बिजनौरमधील नूरपूरची रहिवासी होती. पहिल्या नवऱ्याशी तिचा वाद झाला आणि त्यानंतर तिने जफरबरोबर रिलेशनशिपमध्ये राहायला सुरुवात केली. तिलाही पहिल्या पतीपासून एक मुलगा आहे.

 

 

अन्य महत्वाच्या बातम्या :

धक्कादायक! अनुकंपा नोकरी मिळविण्यासाठी पित्याला ठार मारले; आई, भावाचीही मदत

 

खूनप्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी पुन्हा सेवेत दाखल

 

३० वर्षांपूर्वी झाला होता कथित 'मृत्यू'; बँक फसवणुकीत CBIची तपासाची चक्रे फिरली अन् निघाला जिवंत

 

आयएएस अधिकाऱ्यावर महिलेने केला लैंगिक शोषणाचा आरोप, मुख्यमंत्र्यांनी केले निलंबित 

 

उमरग्यात खून करुन पुण्यात आलेल्या दोघांना अटक

 

लॉकडाऊन दरम्यान स्पा सेंटरच्या नावाखाली चालवले जात होते सेक्स रॅकेट

 

चोरांनी दिलं पोलिसांना खुलं आव्हान; फिल्मी स्टाईलनं सांगितली चोरीची वेळ अन् तारीख

 

युद्ध आमुचे सुरू... जम्मू-काश्मीरमध्ये सहा महिन्यात 93 दहशतवाद्यांना कंठस्नान

Web Title: Husband's pregnant girlfriend called out of the house and shoot out ... Video get Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.