अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 18:14 IST2025-10-27T17:54:01+5:302025-10-27T18:14:18+5:30
अनेक दिवसांपासून लैंगिक शोषण आणि छळ करण्यात आल्याचे येकरने सुसाईट नोटमध्ये लिहिले आहे. दीर्घकाळापर्यंतचा अपमान, दबाव आणि धमक्यांमुळे त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचा दावा केला आहे.

अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
अरुणाचल प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी दोघांच्या आत्महत्येप्रकरणी माजी आयपीएस अधिकारी टी. पोटोम यांना अटक केली. दिल्ली सरकारमधील विशेष सचिव पोटोम यांनी आज सकाळी निर्जुली पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले. पोलिसांनी त्यांना अटक केली, गुरुवारी प्रकरण उघड झाल्यापासून ते बेपत्ता होते, त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध लूकआउट नोटीस जारी केली होती.
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
मिळालेल्या माहितीनुसार, पोटोम हा भारतीय दंड संहिता (BNS) २०२३ च्या अनेक तरतुदींनुसार दाखल केलेल्या गुन्ह्यात हवा होता, यामध्ये आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि गुन्हेगारी गैरवर्तन यांचा समावेश आहे. हा खटला गोमचू येकर या तरुण मल्टी-टास्किंग स्टाफ मेंबरच्या मृत्यूशी संबंधित आहे, त्याने २३ ऑक्टोबर रोजी निर्जुली येथील लेखी गावात त्याच्या भाड्याच्या घरात आत्महत्या केली.
छळ आणि जबरदस्तीचे आरोप
आत्महत्या केलेल्या ठिकाणी एक चिठ्ठी सापडली. यामध्ये ग्रामीण बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पोटोम आणि लिकवांग लोवांग या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी छळ आणि जबरदस्तीचा आरोप केला आहे. 'लोवांग यांनीही त्याच दिवशी लोंगडिंग जिल्ह्यातील त्यांच्या निवासस्थानी आत्महत्या केली. पोलिसांनी सुरुवातीला निर्जुली पोलिस ठाण्यात फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १९४ अंतर्गत अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला. अनेक सुसाईड नोट्स सापडल्या आहेत, यामध्ये येकर यांनी दोन्ही अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले असल्याचा दावा केला आहे.
सुसाईड नोटमध्ये एचआयव्हीचा उल्लेख
आत्महत्या केलेल्या ठिकाणी एक चिठ्ठी सापडली. यामध्ये लैंगिक शोषण आणि छळ बराच काळ चालू होता असे म्हटले आहे. दीर्घकाळापर्यंतचा अपमान, दबाव आणि धमक्यांमुळे त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडले. त्या चिठ्ठीत जिव्हाळ्याचे संबंध आणि फसवणूक यासह विविध आरोप केले आहेत. एचआयव्ही झाला आहे आणि एका अधिकाऱ्याने सोडून दिले आहे आणि ब्लॅकमेल केले आहे, असा दावा या चिठ्ठीमध्ये केला आहे. त्यांना १ कोटी आर्थिक मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, हे नंतर पूर्ण झाले नाही. जर मी मेलो तर ते अधिकाऱ्यामुळे होईल. कृपया मला न्याय द्या, असंही या चिठ्ठीमध्ये म्हटले आहे.