हाय अलर्ट! लष्कर - ए - तोयबाचे अतिरेकी समुद्रमार्गे मुंबईत घुसण्याचा तयारीत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 20:49 IST2019-01-29T20:47:59+5:302019-01-29T20:49:23+5:30
सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड समुद्र किनाऱ्यावरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे

हाय अलर्ट! लष्कर - ए - तोयबाचे अतिरेकी समुद्रमार्गे मुंबईत घुसण्याचा तयारीत?
ठळक मुद्दे लष्कर - ए - तोयबाची अतिरेकी समुद्रमार्गे मुंबईत घुसण्याची खात्रीलायक मागणी सुरक्षा यंत्रणांना मिळाली आहे.मुंबईसह संबंध महाराष्ट्रात हाय अलर्ट असल्याने पोलीस यंत्रणा सतर्क आहेत.
मुंबई - नुकतीच महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने मुंब्रा आणि औरंगाबाद येथून १० दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्यातच लष्कर - ए - तोयबाची अतिरेकी समुद्रमार्गे मुंबईत घुसण्याची खात्रीलायक मागणी सुरक्षा यंत्रणांना मिळाली आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड समुद्र किनाऱ्यावरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईसह संबंध महाराष्ट्रात हाय अलर्ट असल्याने पोलीस यंत्रणा सतर्क आहेत.