बस चालकाला हृदयविकाराचा झटका; दुसऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2021 16:23 IST2021-12-09T16:21:59+5:302021-12-09T16:23:03+5:30
Suicide Case : दीपक हिरामण पाटील (४५, रा. मंगरुळ ता. अमळनेर) हा बसचालक गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास ड्युटीवर आला. बस आगारातच त्याला हृदयविकाराचा झटका आला. तिथे असलेल्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार लक्षात येताच त्यांनी दीपक याला खासगी दवाखान्यात दाखल केले.

बस चालकाला हृदयविकाराचा झटका; दुसऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
जळगाव : एस.टी. कर्मचाऱ्यांचा संपाला आता वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे. अमळनेरात एका चालकाला ड्युटीवर असताना हृदयविकाराचा झटका आला तर रावेर येथे निलंबित बसचालकाने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या दोन घटना गुरुवारी दुपारी घडल्या.
दीपक हिरामण पाटील (४५, रा. मंगरुळ ता. अमळनेर) हा बसचालक गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास ड्युटीवर आला. बस आगारातच त्याला हृदयविकाराचा झटका आला. तिथे असलेल्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार लक्षात येताच त्यांनी दीपक याला खासगी दवाखान्यात दाखल केले.
रावेर येथे राहुल विश्वास कोळी (३७, रा. तांदुळवाडी ता. रावेर) या चालकाला निलंबित करण्यात आले आहे. या तणावात त्याने बस आगरातच विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी दुपारी १ वाजता ही घटना घडली.