आज सुनावणी पूर्ण, आ. नितेश राणेंच्या नियमित जामीन अर्जावर उद्या निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 18:22 IST2022-02-08T18:21:31+5:302022-02-08T18:22:29+5:30

Nitesh Rane : कणकवलीतील संतोष परब हल्ला प्रकरण; न्यायालयात आज सुनावणी पूर्ण

Hearing completed today, decision on MLA Nitesh Rane's regular bail application tomorrow | आज सुनावणी पूर्ण, आ. नितेश राणेंच्या नियमित जामीन अर्जावर उद्या निर्णय

आज सुनावणी पूर्ण, आ. नितेश राणेंच्या नियमित जामीन अर्जावर उद्या निर्णय

ओरोस : आमदार नितेश राणे यांच्या नियमित जामीन अर्जावरील सुनावणी आज पूर्ण झाली असून उद्या याबाबतचा निर्णय देण्यात येईल, असे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.व्ही.हांडे यांनी सांगितले.

याप्रकरणी सरकारी पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकील प्रदीप घरत, भूषण साळवी यांनी तर बचाव पक्षाच्यावतीने वकील सतीश मानेशिंदे, संग्राम देसाई यांनी जोरदार युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीश हांडे यांनी निकाल उद्या जाहीर केला जाईल असे जाहीर केले आहे.

आमदार नितेश राणेंच्या जामीन अर्जावर येत्या सोमवारी सुनावणी, 'म्हणून' सुनावणी पुढे ढकलली

नितेश राणेंना वैद्यकीय तपासणीसाठी कोल्हापुरात आणण्याची शक्यता

दरम्यान काल, सोमवारी राणे यांना छातीत दुखत असल्याने दुपारी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांची इको चाचणी घेण्यात आली. मात्र, या चाचणीचा अहवाल सामान्य आला, पण त्यांचा रक्तदाब वाढला होता. सध्याही त्यांना स्पॉन्डिलायटिसचा त्रास असून, त्यावर आता उपचार करण्यात येणार आहेत. विविध विभागांचे प्रमुख डॉक्टर त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहेत.

Web Title: Hearing completed today, decision on MLA Nitesh Rane's regular bail application tomorrow