शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

उसन्या पैशाचा तगादा लावल्याने भाजीवाल्याची तारेने गळा आवळून हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 17:16 IST

उल्हासनगर कॅम्प नं ५ परिसरात राहणारे ७० वर्षीय शेजुमल रामनानी यांचा मृतदेह वसार गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला गेल्या आठवड्यात मिळाला.

ठळक मुद्देवृद्धाचा निर्मनुष्य ठिकाणी नेवून लोखंडी तारेने गळा आवळून वृद्धाचा खून केला.शेजुमल रामनानी यांच्याकडून भाजी विक्री चे काम करणाऱ्या विठ्ठल दुधेशिया याने ५ हजार रुपये उसनवारी वर घेतले होते.

उल्हासनगर - गेल्या आठवड्यात वृद्धाच्या खून प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाने एकाला केली. उसने दिलेल्या पैशाचा तगादा लावल्याचा रागातून भाजी विक्रेत्याने, वृद्धाचा निर्मनुष्य ठिकाणी नेवून लोखंडी तारेने गळा आवळून वृद्धाचा खून केला.उल्हासनगर कॅम्प नं ५ परिसरात राहणारे ७० वर्षीय शेजुमल रामनानी यांचा मृतदेह वसार गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला गेल्या आठवड्यात मिळाला. लोखंडी तारेने गळा आवळून खून केल्या प्रकरणी हिललाईन पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला. शहर गुन्हे अन्वेषण विभागाने गुप्त खबरी व सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे तपास करून, भाजी विक्रेता विठ्ठल गणेश दूधेशिया याला अटक करून बोलते केले. तेव्हा खुनाची कबुली त्याने दिली.शेजुमल रामनानी यांच्याकडून भाजी विक्री चे काम करणाऱ्या विठ्ठल दुधेशिया याने ५ हजार रुपये उसनवारी वर घेतले होते. दरम्यान शेजुमल यांनी उसने घेतलेले पैसे देण्याचा तगादा विठ्ठल दुधेशिया यांच्याकडे लावला. शेजूमल यांच्या पैसे मागण्याच्या तगाद्याला तर विठ्ठल दुधेशिया याने १८ जूनला उसने घेतलेले पैसे देण्याच्या बहाण्याने बोलावून शेजुमाल यांना दुचाकी गाडीवर बसून वसार गावाकडील निर्मनुष्य ठिकाणी नेले. त्याठिकाणी लोखंडी तारेने गळा आवळून खून केला. शेजुमल रामनानी मृत झाल्याची खात्री पटल्यावर घराकडे पळ काढला. अशी माहिती आरोपी विठ्ठल दुधे शिया याने पोलिस अधिकारी यांना दिल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे महेश तरडे यांना दिली. याप्रकरणी हिललाईन ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल होऊन अधिक तपास गुन्हे अन्वेषण विभाग करीत आहेत.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

नग्नावस्थेत फ्रिजमध्ये आढळले महिलेचे अर्धवट शरीर, बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याची शक्यता 

 

Shocking! भारत-चीन सीमेवर IES अधिकारी बेपत्ता, घरात सुरू होती लगीनघाई

 

लज्जास्पद! अपहरण करून मुलीवर बलात्कार; चौघांना अटक, मुख्य आरोपी भाजपा पंच फरार

 

विवस्त्र करून तरुणाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी घेतले दोघांना ताब्यात

 

थरारक! दुचाकी पार्किंगच्या वादातून महिलेची केली चाकू भोसकून हत्या 

 

खळबळजनक! १६ वर्षांच्या TikToker तरुणीची आत्महत्या; रात्री मॅनेजरशी गाण्याबद्दल बोलली, अन्...

 

धक्कादायक! हालाखीच्या परिस्थितीला कंटाळून महिलेने मुलीला गळफास लावून स्वतःही केली आत्महत्या

टॅग्स :ArrestअटकMurderखूनulhasnagarउल्हासनगरPoliceपोलिस