शेतमाल विकण्यासाठी वडिलांसोबत बाजारात आलेल्या तरुणीला तिच्या बॉयफ्रेंडने रस्त्यात गाठलं. तिच्याशी बोलत असताना वाद सुरू झाला. अचानक तरुणाने चाकू काढला आणि तरुणीच्या गळ्यावर वार केला. वडिलांसमोरच तरुणाने तिचा जीव घेतला. मेघालयातील इस्टर्न वेस्ट खासी हिल्स जिल्ह्यात ही घटना घडली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
तरुणी मंगळवारी (१ जुलै) तिच्या वडिलांसोबत इस्टर्न वेस्ट खासी हिल्स जिल्ह्यातील मैरांग पायंडेंगुमिआँग येथे शेतातील माल विकण्यासाठी गेली होती, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
वाचा >>झोपत नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, बापाचं क्रूर कृत्य!
फिरनेलिन खारसिंट्यू (वय २४) असे मयत तरुणीचे नाव आहे. तर रॉबर्टो मार्नगर असे तिच्या बॉयफ्रेंडचे नाव आहे. ते दोघे मागील काही काळापासून रिलेशनमध्ये होते, अशी माहितीही समोर आली आहे.
गर्लफ्रेंडची कशी केली हत्या?
एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, आरोपी तरुणीच्या पाठीमागून आला. त्याने तिला पाठीमागून लाथ मारली. त्यामुळे ती खाली पडली. त्यानंतर तो तिला मारत राहिला. हे इतकं पटकन घडलं की, काही करायलाही वेळ मिळाला नाही. तिच्या गळ्यातून प्रचंड रक्त येत होतं. त्याने तिचा गळा चिरला होता", असे आरोपीला रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीने सांगितले.
आरोपीने तरुणीच्या गळ्यावर चाकूने वार केले. त्यामुळे ती जागेवरच पडली. तिला प्रचंड रक्तस्राव झाला. तातडीने तिला मैरांग सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
पळून जाण्याच्या प्रयत्न असतानाच आरोपीला पकडले
तरुणीवर हल्ला केल्यानंतर आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. तो पळत असतानाच त्याला पार्किंगजवळ लोकांनी पकडले. पोलीस घटनास्थळी आल्यानंतर आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात आले.
आम्ही हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. हत्या का केली, याबद्दल तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासानुसार अशी माहिती हाती आली आहे की, तरुण आणि तरुणी रिलेशनमध्ये होते. तरुणीने ब्रेकअप केल्याच्या कारणातून ही हत्या केली गेल्याचे दिसत आहे, असे पोलिसांनी सांगितले.