गर्लफ्रेंडला हॉटेलमध्ये घेऊन गेला, मद्यपान करून घेतली व्हायग्रा गोळी; नंतर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 17:46 IST2025-01-17T17:44:35+5:302025-01-17T17:46:47+5:30
लखनौवरून ग्वालियरला आल्यानंतर तरुणाने त्याच्या दिल्लीत राहणाऱ्या गर्लफ्रेंडलाही बोलावून घेतले. त्यानंतर त्याने मद्यपान केले आणि व्हायग्राची गोळी घेतली.

गर्लफ्रेंडला हॉटेलमध्ये घेऊन गेला, मद्यपान करून घेतली व्हायग्रा गोळी; नंतर...
ऑफिसच्या कामासाठी लखनौवरून ग्वालियरला आलेल्या तरुणाने हॉटेल बुक केली. त्याने दिल्लीत राहणाऱ्या त्याच्या गर्लफ्रेंडलाही बोलावून घेतले. दोघे रुममध्ये असताना तरुणाने मद्यपान केले आणि त्यानंतर व्हायग्राची गोळी घेतली. तासाभरातच त्याची प्रकृती बिघडली आणि मृत्यू झाला. पोलिसांना हॉटेल रुममध्ये दारूची बाटली आणि लैंगिक शक्ती वाढवणाऱ्या व्हायग्रा गोळ्या सापडल्या आहेत.
ही घटना ग्लावियरमधील मॅक्सन हॉटेलमध्ये घडली आहे. मृत तरुणाचे नाव दिव्याशू असे आहे. तरुणाने हॉटेलची रुम बुक केली होती. तो एका खासगी कंपनीत कामाला होता आणि ऑफिसच्या कामानिमित्तानेच ग्वालियरला आला होता.
दिल्लीतील गर्लफ्रेंडला घेतलं बोलावून
पोलिसांनी सांगितले की, दिव्यांशूने दिल्लीत राहणाऱ्या गर्लफेंडला बोलावून घेतले होते. १४ जानेवारीच्या रात्री ते दोघेच रुममध्ये होते. यावेळी दिव्यांशू दारू प्यायला आणि त्यानंतर त्याने लैंगिक शक्ती वाढवणारी व्हायग्राची गोळी घेतली. जवळपास तासभर दोघे रुममध्ये होते.
रात्री ११ वाजता दिव्यांशूला अस्वस्थ वाटू लागलं. त्याला अचानक घाम यायला लागला. त्याला अशा अवस्थेत बघून त्याची गर्लफ्रेंड घाबरली आणि तिने याची माहिती हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना दिली.
हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी कॉल करून पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी दिव्य़ांशू रुग्णालयात दाखल केले. पण, उपचार सुरू करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. दारू प्यायल्यानंतर त्याने व्हायग्रा गोळी घेतली. ओव्हर डोज झाल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला.
या प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरू केला असून, त्याच्या गर्लफ्रेंडचीही चौकशी करणार आहेत.