शहरं
Join us  
Trending Stories
1
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
2
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
3
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
4
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
5
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
6
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
7
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
8
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
9
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
10
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
11
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
12
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
13
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
14
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
15
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
16
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
17
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
18
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
19
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
20
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

एक्स गर्लफ्रेंडचा फोटो मोबाईलचा डीपी ठेवून म्हणाला "कलियुगाची द्रौपदी" अन् झाली अटक 

By पूनम अपराज | Published: November 07, 2020 4:09 PM

Crime News : अखेर कंटाळून तिने प्रियकराच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. नंतर पोलिसांनी प्रियकराला ताब्यात घेतलं आहे.

ठळक मुद्दे पीडित मुलगी ही गुजरातच्या राजकोट येथे राहते. हितेष नावाच्या मुलासोबत तिचे काही दिवसांपूर्वी प्रेमसबंध जुळले होते.त्याचबरोबर तो प्रेयसीला Whats App वरून अश्लिल मेसेज आणि व्हिडिओ पाठवत होता. या संपूर्ण प्रकारामुळे पीडित तरुणी त्रस्त झाली होती.

गुजरातच्या राजकोटमध्ये एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. ब्रेकअपनंतर एका व्यक्तीने एक्स गर्लफ्रेंडच्या फोटोवर कलियुगाची द्रौपदी लिहिले आणि तो फोटो मोबाईल डीपीवर ठेवला. मुलीने हा डीपी पाहिल्यावर तिने या प्रकरणाची तक्रार पोलिसांकडे केली. त्यानंतर पोलिसांनी प्रियकराला ताब्यात घेतलं आहे.

पीडित मुलगी ही गुजरातच्या राजकोट येथे राहते. हितेष नावाच्या मुलासोबत तिचे काही दिवसांपूर्वी प्रेमसबंध जुळले होते. राजकोटमध्येच या दोघांचे अफेअर सुरु झाले. मात्र,थोड्याच दिवसांत त्यांच्यातील प्रेमसंबंध उघडले आणि दोघांत कटुता आली. प्रियकर पीडितेला सतत त्रास देऊ लागला. त्यामुळे प्रेयसीने हे नातं कायमचं तोडलं. पीडित मुलीचे हितेषसोबत ब्रेकअप झाले. त्यानंतरही प्रियकर प्रेयसीला अधिकच त्रास देऊ लागला. प्रेयसीने प्रियकाराला बऱ्याचदा समजावून सांगितले. पण तो ऐकत नव्हता. अखेर प्रियकराने तिची सोशल मीडियावरून बदनामी करायला सुरूवात केली. प्रियकराने प्रेयसीचा फोटो Whats Appवर अपलोड करून तिची बदनामी केली. 'कलियुगाची द्रौपदी' असं म्हणून प्रियकराने प्रेयसीचा फोटो आपल्या Whats App डिपीवर अपलोड केला. त्याचबरोबर तो प्रेयसीला Whats App वरून अश्लिल मेसेज आणि व्हिडिओ पाठवत होता. या संपूर्ण प्रकारामुळे पीडित तरुणी त्रस्त झाली होती. अखेर कंटाळून तिने प्रियकराच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. नंतर पोलिसांनी प्रियकराला ताब्यात घेतलं आहे.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपArrestअटकGujaratगुजरात