वाहतूक पोलिसाचे शर्ट पकडून केली मारहाण, गार्डनला देखील केली शिवीगाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 20:06 IST2022-03-24T20:05:11+5:302022-03-24T20:06:05+5:30

Assaulting Case : उल्हासनगर कॅम्प नं-३ नेहरू चौकात वाहतूक पोलीस हवालदार आकाश चव्हाण हे बुधवारी अडीज वाजता वाहतूक नियमांचे कर्तव्य बजावत होते.

He grabbed the shirt of the traffic policeman and beat him up, He also insulted the garden | वाहतूक पोलिसाचे शर्ट पकडून केली मारहाण, गार्डनला देखील केली शिवीगाळ

वाहतूक पोलिसाचे शर्ट पकडून केली मारहाण, गार्डनला देखील केली शिवीगाळ

सदानंद नाईक 

उल्हासनगर : नेहरू चौकात बुधवारी दुपारी अडीज वाजता वाहतूक नियमांचे कर्तव्य करणारे पोलीस हवालदार आकाश चव्हाण व वाहतूक गार्डनला शिवीगाळ व मारहाण केल्या प्रकरणी राजेश कटारिया याच्यावर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. अधिक तपास पोलीस करीत असून नशेडी नागरिकांची संख्येत वाढ झाली आहे. 

उल्हासनगर कॅम्प नं-३ नेहरू चौकात वाहतूक पोलीस हवालदार आकाश चव्हाण हे बुधवारी अडीज वाजता वाहतूक नियमांचे कर्तव्य बजावत होते. त्यावेळी राजेश कटारिया नावाचा इसम जोरजोरात ओरडत सरबतवाल्याला घेऊन त्यांच्याकडे आला. त्यावेळी चव्हाण यांनी मोठ्याने ओरडू नको, शांत राहून झालेला प्रकार सांग, असे बोलले. सरबतवाला ५ रुपयांचा बर्फ देत नसल्याचे सांगून पुन्हा ओरडू लागला. पुन्हा चव्हाण यांनी ओरडू नको असे बजाविले. याचा राग कटारिया याला येऊन त्याने हवालदार चव्हाण यांना शिवीगाळ करून शर्ट पकडून धक्काबुक्की केली. यावेळी उपस्थित असलेला वाहतूक गार्डन निलेश बडगुजर यांनाही शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात कटारिया याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: He grabbed the shirt of the traffic policeman and beat him up, He also insulted the garden