शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
6
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
7
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
8
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
9
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
10
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
11
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
12
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
13
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
14
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
15
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
16
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
17
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
18
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
19
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
20
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 09:32 IST

एका तरुणाने आपल्या मित्राच्या पत्नीची निर्घृण हत्या केली अन् पुढे जे झालं ते पाहून सगळे हादरले.

बंगळुरूमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एका तरुणाने आपल्या मित्राच्या पत्नीची निर्घृण हत्या केली आणि त्यानंतर स्वतः फाशी घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले असून तपास सुरू केला आहे. मात्र, हत्या आणि आत्महत्येमागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मृत महिला आणि आरोपीच्या पतीमध्ये गेल्या दोन वर्षांपासून मैत्री होती. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर शोककळा पसरली आहे.

आरोपीने आतून बंद केला होता दरवाजाही घटना बेंगळुरूच्या अनेकल तालुक्यात असलेल्या हेब्बागोडी येथील तिरुपाल्या भागात घडली आहे. मृत महिलेचं नाव मंदिरा मंडल (२७) असून, ती मूळची पश्चिम बंगालची आहे. मंदिराचं लग्न आठ वर्षांपूर्वी बिजोन मंडल यांच्यासोबत झालं होतं आणि त्यांना ६ वर्षांचा मुलगा आहे. मात्र, दोन वर्षांपूर्वी ती पतीपासून वेगळी झाली आणि तिरुपाल्या येथील एका भाड्याच्या घरात राहू लागली.

मंगळवारी संध्याकाळी मंदिरा नेहमीप्रमाणे कामावरून घरी परतली. तिचा मुलगा बाहेर खेळत होता. त्याचवेळी आरोपी सुमन घरात घुसला आणि त्याने दरवाजा आतून बंद केला. बराच वेळ दरवाजा न उघडल्याने मुलाने घाबरून आपल्या आजीला ही गोष्ट सांगितली. त्यांनीही खूप वेळ दरवाजा वाजवला, पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही.

हत्या करून आरोपीने केली आत्महत्याअखेरीस, महिलेने खिडकीतून आत डोकावून पाहिलं असता तिला धक्काच बसला. तिला सुमन फाशी घेतलेला दिसला. त्यानंतर तात्काळ पोलिसांना बोलावण्यात आलं. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, एका खोलीत मंदिरा मंडल यांचा गळा कापलेला मृतदेह आढळला. तर दुसऱ्या खोलीत सुमनचा मृतदेह छताला लटकलेल्या अवस्थेत होता. मंदिराचा पती बिजोन मंडल आणि आरोपी सुमन हे दोघे मित्र होते आणि गेल्या दोन वर्षांपासून अंदमानमध्ये एकत्र काम करत होते.

पोलीस तपासात नेमकं काय समोर आलं?आरोपी सुमन १५ दिवसांपूर्वीच बंगळुरूला परतला होता. तो तिरुपाल्यामध्ये त्याच्या आई-वडिलांसोबत राहत होता आणि एका कारखान्यात सुरक्षा रक्षक म्हणून रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करत होता. मंगळवारी रात्री तो थेट मंदिराच्या घरी आला आणि तिची हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने भाजी कापण्याच्या चाकूने तिचा गळा चिरला आणि नंतर स्वतःला फाशी घेतली असावी, अशी शक्यता आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमागील नेमकं कारण शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBengaluruबेंगळूरDeathमृत्यू