माझ्याशी सेक्स चॅट कर, नाहीतर...; सहावीच्या मुलाची तरुणीला धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 15:28 IST2020-05-22T15:26:47+5:302020-05-22T15:28:06+5:30

या सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने २१ वर्षीय तरुणीला मला पैसे दे अथवा माझ्याशी सेक्स चॅट कर नाहीतर मी मॉर्फ केलेले फोटो व्हायरल करेन असं सांगून धमकी दिली.

Have sex chat with me otherwise Sixth standard boy threaten to 21 years girl pda | माझ्याशी सेक्स चॅट कर, नाहीतर...; सहावीच्या मुलाची तरुणीला धमकी

माझ्याशी सेक्स चॅट कर, नाहीतर...; सहावीच्या मुलाची तरुणीला धमकी

ठळक मुद्देया प्रकरणातील पीडिता २१ वर्षीय महिला आणि विद्यार्थी हे एका टेलिग्राम ग्रुपमध्ये आहेततिच्या पालकांनी कवी नगर पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास केला आणि सायबर गुन्हा करणाऱ्यास शोधून काढले.मेसेज पाठवणाऱ्याने हे फोटो दाखवून तिला धमकावून माझ्याशी सेक्स चॅट कर अन्यथा तुझे हे फोटो व्हायरल करेन असे सांगितले. या प्रकरणामुळे तरुणी खूप घाबरली.

गाझियाबाद -  गाजियाबाद येथे सहावी इयत्तेत इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने २१ वर्षीय तरुणीचा लैंगिक छळ केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने २१ वर्षीय तरुणीला मला पैसे दे अथवा माझ्याशी सेक्स चॅट कर नाहीतर मी मॉर्फ केलेले फोटो व्हायरल करेन असं सांगून धमकी दिली.

 
या प्रकरणातील पीडिता २१ वर्षीय तरुणी आणि विद्यार्थी हे एका टेलिग्राम ग्रुपमध्ये आहेत. या ग्रुपमधून महिलेचा मोबाईल क्रमांक त्या मुलाने घेतला आल्याची माहिती पोलिसांनी दिली. पीडित तरुणी बीएस्सी उत्तीर्ण असून ती सध्या स्पर्धापरीक्षांचा सराव करत आहे. तिने पोलिसांना १८ मोबाईलचे स्क्रीन शॉट तपासासाठी दिले आहेत. कवी नगर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. ७ मे रोजी स्टडी मटेरियल एक्स्चेंग करण्यासाठी तिला एक मेसेज आला. त्यात अभ्यासासंबंधी विचारणा केली होती. त्यावर तिने रिप्लाय दिला. त्यानंतर काही वेळाने तिला तिचेच मॉर्फ केलेले आक्षेपार्ह फोटो त्या मेसेजवर आले. मेसेज पाठवणाऱ्याने हे फोटो दाखवून तिला धमकावून माझ्याशी सेक्स चॅट कर अन्यथा तुझे हे फोटो व्हायरल करेन असे सांगितले. या प्रकरणामुळे तरुणी खूप घाबरली. त्यानंतर तिच्या पालकांनी विचारणा केल्यानंतर तिने घडलेला प्रकार सांगितला. 

तिच्या पालकांनी कवी नगर पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास केला आणि सायबर गुन्हा करणाऱ्यास शोधून काढले. हे चॅट १२ वर्षांच्या एका मुलाच्या फोनमधून केल्याचं आढळलं. हा मुलगा सहावीत शिकतो. तो टेलिग्रामच्या स्टडी ग्रुपमध्ये आहे. त्याच्यावर पीडित तरुणीच्या पालकांनी सेक्स चॅटची धमकी आणि पैसे मागितल्याचा आरोप केला आहे. तसेच मुलाने आपला फोन हॅक झाला असून आपल्याला याबाबत कोणतीही कल्पना नसल्याचं म्हटलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंदवली असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी भा. दं. वि. कलम ५०७, ३८६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. 

 

Coronavirus : पोलीस दलाला कोरोनाचा वाढता विळखा, ठाण्यात महिला पोलिसाचा मृत्यू

 

विकृत! ५१ वर्षीय व्यक्तीने मृतदेहाशी सेक्स करण्याचा केला प्रयत्न 

 

धक्कादायक! मुलाला 'क्राईम सिरीअल' दाखवत तयार केले; मातेने तिहेरी हत्याकांड घडवलं

 

लॉकडाऊनमध्ये स्पा सेंटरमध्ये अश्लिल चाळे सुरु होते, तितक्यात पोलिसांची धाड पडली अन्...

Web Title: Have sex chat with me otherwise Sixth standard boy threaten to 21 years girl pda