शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

Hathras Gangrape : रामदास आठवले जाणार कुटुंबियांच्या भेटीला, आझाद मैदानावर करणार आंदोलन

By पूनम अपराज | Published: September 30, 2020 7:16 PM

Hathras Gangrape : 2 ऑक्टोबरला हाथरसमधील पीडित मृत दलित मुलीच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले घेणार आहेत.

ठळक मुद्देहाथरसच्या हृदयद्रावक घटनेचे पडसाद आता संपूर्ण भारतात उमठण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा या प्रकरणी राजीनामा मागितला आहे.

हाथरसमधील पीडित मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्याविरोधात 1 ऑक्टोबर दुपारी 1 वाजता आझाद मैदान मुंबई येथे रिपब्लिकन पक्षातर्फे निषेध आंदोलन करण्यात येणार असून 2 ऑक्टोबरला हाथरसमधील पीडित मृत मुलीच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले घेणार आहेत.हाथरसच्या हृदयद्रावक घटनेचे पडसाद आता संपूर्ण भारतात उमठण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा या प्रकरणी राजीनामा मागितला आहे. त्यामुळे देशातले राजकारण देखील या प्रकरणावरून तापत चालले असल्याचे दिसत आहे. उत्तर प्रदेशच्या हाथरस येथे सामूहिक बलात्कार झालेल्या १९ वर्षीय मुलीने उपचारादरम्यान मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती वृत्तसंस्थेच्या एएनआयने दिली आहे. या मुलीवर १४ सप्टेंबर रोजी तिच्या शेतात चार माणसांनी शेतावर जाताना तिच्यावर बलात्कार केला होता. दुसर्‍या दिवशी तिला अलिगढ येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्, प्रकृती गंभीर असल्याने उत्तम वैद्यकीय सुविधांकरिता तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात हलविण्यात आले. पीडित मुलीची प्रकृती चिंताजनक आणि व्हेंटिलेटरवर होती.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या काळ्या दिवशी ही मुलगी आपल्या आईसह शेतात गेली होती आणि अचानक गायब झाली होती. नंतर अत्यंत गंभीर जखमी अवस्थेत ती आढळून आली. आरोपीने तिचा गळा दाबण्याचा प्रयत्नही केला होता. नंतर पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली होती. हाथरस येथील प्रभारी कोतवाली यांनी त्यांना पोलिस लाइनमध्ये पाठविले. प्रांतीय सशस्त्र कॉन्स्टेबुलरी (पीएसी) महिलेच्या घरी तैनात होते. बहुजन समाज पार्टीच्या (बसपा) अध्यक्षा मायावती यांनी या घटनेचा निषेध केला होता. उत्तर प्रदेशात कोणत्याही समाजातील कोणतीही महिला सुरक्षित नसल्याचे सांगत राज्य सरकारने त्याकडे लक्ष देण्यास सांगितले. तसेच पोलिसांनी परस्पर पीडित मुलीच्या कुटुंबियांना विश्वासात न घेता काल मध्यरात्री २.३० वाजताच्या सुमारास मुलीवर अंत्यसंस्कार केल्याने अजून प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे. 

 

 

 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेHathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कारUttar Pradeshउत्तर प्रदेशagitationआंदोलनPoliceपोलिस