शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

Hathras gangrape : तपासाची चक्रे फिरली! घटनास्थळी सीबीआयचे पथक फॉरेन्सिक तज्ञांसह दाखल

By पूनम अपराज | Published: October 13, 2020 3:15 PM

Hathras gangrape : दुसरीकडे सीबीआयची तपासणी पथक पीडित मुलीच्या गावी पोहोचले आहे. या पथकात फॉरेन्सिक तज्ञही आहेत. ही टीम घटनास्थळी पोहोचली असून पुरावे जमा करण्याचा प्रयत्न करीत आहे.

ठळक मुद्देही टीम घटनास्थळी पोहोचली असून पुरावे जमा करण्याचा प्रयत्न करीत आहे.

हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणात आता कारवाईस सुरुवात झाली आहे. सोमवारी अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनऊ खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी घेतली, ज्यामध्ये पीडितेच्या कुटूंबाने कोर्टासमोर आपली व्यथा मांडली. याबाबत पुढील सुनावणी २ नोव्हेंबरला घेण्यात येणार आहे. दुसरीकडे सीबीआयची तपासणी पथक पीडित मुलीच्या गावी पोहोचले आहे. या पथकात फॉरेन्सिक तज्ञही आहेत. ही टीम घटनास्थळी पोहोचली असून पुरावे जमा करण्याचा प्रयत्न करीत आहे.

मंगळवारी सीबीआयची टीम बुलगढी गावच्या वेगवेगळ्या भागात जाऊन तपास करण्यासाठी गेली. सीडीआयने ज्या ठिकाणी व्हिडिओग्राफी केली होती तेथे जवळपास तीन तास सीबीआयला लागले आणि पीडितेच्या कुटूंबातील सदस्यांकडून क्राईम सीन पुन्हा निर्माण करण्यासाठी प्रश्नउत्तरांचे सत्र पार पडले. क्राईम सीननंतर सीबीआयचे पथक पोलिसांनी पीडितेवर अंत्यसंस्कार केलेल्या ठिकाणी पोहोचले.

सुनावणीदरम्यान हायकोर्टाने फटकारलंसोमवारी हायकोर्टात हाथरस घटनेची सुनावणी पार पडली. यावेळी पीडितेच्या कुटूंबाने त्यांचे म्हणणे न्यायालयासमोर नोंदवले आणि स्थानिक प्रशासनाने त्यांच्या संमतीशिवाय घाईघाईत पीडितेचे अंत्यसंस्कार केले असा आरोप केला. पीडितेच्या कुटूंबाच्या वकील सीमा कुशवाहा यांच्या म्हणण्यानुसार कोर्टाने सरकारी प्रतिनिधींकडे कठोर प्रश्न विचारले ज्या दरम्यान त्यांच्याकडे उत्तर नव्हते.हाथरसमधील सामूहिक बलात्कारप्रकरणी अलााबाद हायकोर्टाच्या लखनौ खंडपीठाने स्वत: दखल घेत सुनावणी सुरू केली होती. दरम्यान, काल झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने प्रशासनाच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच एडीजी लॉ अँड ऑर्डर प्रशांत कुमार यांची खरडपट्टी काढली. जर ही तुमची मुलगी असती तर तिचा चेहरा न पाहता अंत्यसंस्कार केले असते का? असा सवाल न्यायमूर्तींनी विचारला. न्यायमूर्तींच्या या प्रश्नावर एडीजी लॉ अँड ऑर्डर निरुत्तर झाले. त्यांच्याकडे प्रश्नाचे काहीही उत्तर नव्हते.हायकोर्टात झालेल्या सुनावणीनंतर पीडितेच्या कुटुंबीयांच्या वकील सीमा कुशवाहा यांनी ही माहिती दिली. एडीजींनी कायद्याची डेफिनेशन वाचली पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला. न्यायालयात जेव्हा न्यायमूर्तींनी प्रतिप्रश्न केले तेव्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांतडे त्याची काहीही उत्तरे नव्हती. ज्याप्रकारे खंडपीठाची आणि न्यायमूर्तीची भूमिका होती ते पाहता समाजात एक चांगला संदेश जाईल, अशी आशाही पीडित कुटुंबाच्या वकील सीमा कुशवाहा यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Hathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कारHigh Courtउच्च न्यायालयUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसCBIगुन्हा अन्वेषण विभाग