घृणास्पद! मृत मित्राच्या मुलीला पाठवला अश्लील व्हिडीओ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 21:37 IST2018-12-20T21:35:04+5:302018-12-20T21:37:29+5:30

एका मित्रानं १९ वर्षीय तरुणीला तिच्या मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाठवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. तरुणीनं वांद्रे पोलीस ठाण्यात जावून याबाबत तक्रार दाखल केली आहे. 

 Hateful! Porn videos sent to a friend of a dead friend | घृणास्पद! मृत मित्राच्या मुलीला पाठवला अश्लील व्हिडीओ 

घृणास्पद! मृत मित्राच्या मुलीला पाठवला अश्लील व्हिडीओ 

ठळक मुद्दे१९ वर्षीय तरुणीला तिच्या मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाठवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. वडिलांचा मित्र असल्याचे सांगून लालचंद (४०) या भामट्याने तरुणीचा मोबाइल नंबर मिळवला. पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीवरून लालचंदविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेत आहे

मुंबई - वडिलांच्या निधनानंतर सांत्वन करण्यासाठी आलेल्या वडिलांच्या एका मित्रानं १९ वर्षीय तरुणीला तिच्या मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाठवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. तरुणीनं वांद्रे पोलीस ठाण्यात जावून याबाबत तक्रार दाखल केली आहे. 

वांद्रे येथे राहणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणीच्या वडिलांचे ऑक्टोबर महिन्यात निधन झाले होते. वडिलांचा मित्र असल्याचे सांगून लालचंद (४०) या भामट्याने तरुणीचा मोबाइल नंबर मिळवला. त्यानंतर लालचंदचं तिच्या घरी येणं-जाणं वाढलं. तसेच तिचा पाठलाग करायला सुरुवात केली. तिला दररोज फोन करून त्रास द्यायला सुरुवात केली. १४ डिसेंबर रोजी लालचंदने तरुणीच्या मोबाइलवर अश्लील व्हिडिओ पाठवला. त्यानंतर तिने सरळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन लालचंदविरुद्ध पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीवरून लालचंदविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेत आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश अनावस्कर यांनी दिली आहे.  

Web Title:  Hateful! Porn videos sent to a friend of a dead friend