घृणास्पद... महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 19:23 IST2018-08-14T18:18:25+5:302018-08-14T19:23:14+5:30

दगडाने ठेचले, डोळे फोडले; गोकुल खदानमधील घृणास्पद प्रकार, दोघे ताब्यात, दोन फरार

Hateful gang rape on female employees ... | घृणास्पद... महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार 

घृणास्पद... महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार 

उमरेड/नांद - भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात चार नराधमांनी एका 26 वर्षीय महिला कर्मचाऱ्यावर बलात्कार केल्याची घटना आज दुपारी अडीजच्या सुमारास घडली. सर्वत्र स्वातंत्र्य दिनाची जय्यत सुरू असतानाच महिलेवरील बलात्काराच्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.चौघे  आरोपी हे ट्रकचे चालक आणि वाहक असून यापैकी दोघांना ताब्यात घेण्यात आले तर अन्य दोघे घटनास्थळावरून पसार झाले.

बलात्कारानंतर कुणाकडेही वाच्यता होवू नये आणि आपले पाप लपविण्यासाठी या नराधमांनी ‘त्या’ महिलेला दगडाने ठेचले. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या प्रकारात पिडीत महिलेचे दोन्ही डोळे सुद्धा बलात्का:यांनी फोडले. तिला जीवे मारण्याचा प्रकार केला. सुमारे अध्र्या तासानंतर एका वृद्ध ट्रकचालकामुळे ही बाब उजेडात येताच सर्वत्र धावपळ सुरू झाली.
अत्यंत निजर्नस्थळी बांबूपासून तयार करण्यात आलेल्या तट्टय़ांच्या शौचालयात हा किळसवाणा प्रकार घडला. महिलेची प्रकृती अत्यंत गंभीर झाली असून तिच्यावर तातडीने वेकोली येथील रूग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. तिची प्रकृती अधिकच चिंताजनक असल्याचे ध्यानात येताच लागलीच वेकोली येथून तिला नागपूरला हलविण्यात आले आहे. बराच वेळ गुन्हा घडून उमरेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता. शेतकरी कुटूंबातील वेकोली उमरेड क्षेत्रअंतर्गत गोकुल खदान येते. सुमारे तीन वर्षापासून ही खदान या क्षेत्रत सुरू झाली आहे. पिडीत महिला मुळची मध्यप्रदेश येथील आहे. तिचे आजोबा उमरेड  तालुक्यातील हेवती येथे वास्तव्याला आहेत. हेवती येथील शेती वेकोलीत समाविष्ठ केल्यानंतर सदर महिलेला वेकोली येथे नौकरी मिळाली.

Web Title: Hateful gang rape on female employees ...