भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 11:18 IST2025-10-31T11:17:15+5:302025-10-31T11:18:29+5:30
पत्नीच्या फेसबुक वापरामुळे संतापलेल्या पतीने तिला बेदम मारहाण करून ठार मारलं.

फोटो - आजतक
बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील बिदुपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एराजीकंचनपूर गावातून एक भयानक घटना उघडकीस आली आहे. पत्नीच्या फेसबुक वापरामुळे संतापलेल्या पतीने तिला बेदम मारहाण करून ठार मारलं. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बिदुपूर पोलिसांना माहिती दिली. बिदुपूर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी येऊन महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी हाजीपूर येथील सदर रुग्णालयात पाठवला.
पोलिसांनी आरोपी पती आणि त्याच्या वडिलांना याप्रकरणी अटक केली आहे. दिव्या कुमारी (२७) असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. ती एराजीकंचनपूर गावातील रहिवासी अभिषेक कुमार उर्फ राजाची पत्नी आहे. रिपोर्टनुसार, फेसबुक वापरावरून झालेल्या वादातून तिचा पती अभिषेकने काल रात्री दिव्याला बेदम मारहाण केली, यामध्ये तिचा मृत्यू झाला.
गावकऱ्यांनी आज सकाळी महिलेचे वडील मनोज सिंह यांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच वडील घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बिदुपूर पोलीस ठाण्याला माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी हाजीपूर येथील सदर रुग्णालयात पाठवला. आरोपी पती अभिषेक कुमार उर्फ राजा आणि त्याचे वडील रवी रंजन उर्फ बबलू यांना अटक करण्यात आली आहे. अभिषेक कुमार उर्फ राजा याचा गुन्हेगारी इतिहास आहे.
एसडीपीओ फॉरेस्ट सुबोध कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिदुपूर पोलील स्टेशन हद्दीतील एराजीकंचनपूर गावात एका विवाहित महिलेची हत्या करण्यात आली. वेगाने कारवाई करत बिदुपूर पोलीस स्टेशन प्रमुखांनी आरोपी पती अभिषेक कुमार उर्फ राजा आणि त्याचे वडील रवी रंजन उर्फ बबलू यांना अटक केली. चौकशीदरम्यान, महिलेने फेसबुक वापरल्याने तिच्यावर हल्ला करण्यात आला होता आणि नंतर हत्या करण्यात आली असल्याचं समोर आलं.