आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. टीव्हीचा आवाज कमी करण्यावरून झालेल्या वादातून एका महिलेने आपल्या पतीची हत्या केल्याचा आरोप आहे. शेख अहमद असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव असून तो व्यवसायाने एसी मॅकेनिक होता. अहमद आणि त्याची पत्नी क्रांती गेल्या काही काळापासून TIDCO गृहनिर्माण वसाहतीत एकत्र राहत होते. अहमदने क्रांतीला टीव्हीचा आवाज कमी करण्यास सांगितल्याने दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली होती.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
मिळालेल्या माहितीनुसार, वाद वाढल्यानंतर महिलेने रागाच्या भरात अहमदवर चाकूने हल्ला केला, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. मंगलगिरी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून क्रांतीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. हा हल्ला पूर्वनियोजित होता की रागाच्या भरात अचानक घडला, याचा तपास पोलीस करत आहेत. अहमदचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
अहमद आणि क्रांतीचा प्रेमविवाह
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमद आणि क्रांतीचा प्रेमविवाह झाला होता. सुमारे एक वर्षापूर्वी त्यांनी लग्न केलं होतं. गुरुवारी रात्री क्रांती टीव्ही पाहत असताना अहमदने तिला आवाज कमी करायला सांगितला. मात्र ती त्यासाठी तयार झाली नाही. या किरकोळ वादाचं रूपांतर मोठ्या भांडणात झालं आणि रागाच्या भरात क्रांतीने अहमदवर वार केले.
परिसरात एकच खळबळ
घरातील आरडाओरडा ऐकून शेजारी मदतीसाठी धावले. त्यांना अहमद रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी अवस्थेत आढळला. स्थानिक नागरिकांनी त्याला तातडीने उपचारासाठी विजयवाडा सरकारी रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
Web Summary : In Andhra Pradesh, a woman murdered her husband after an argument about TV volume. The wife, Kranti, fatally stabbed her husband, Ahmed, an AC mechanic, following the dispute. Police are investigating. The couple had a love marriage a year prior.
Web Summary : आंध्र प्रदेश में टीवी की आवाज को लेकर विवाद में पत्नी ने पति की हत्या कर दी। क्रांति नामक पत्नी ने अहमद नामक अपने पति को चाकू मार दिया। पुलिस जांच कर रही है। दंपति ने एक साल पहले प्रेम विवाह किया था।