गुणरत्न सदावर्ते यांना गिरगाव कोर्टात केले हजर, सातारा पोलीस ताबा मागणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 15:40 IST2022-04-11T15:37:41+5:302022-04-11T15:40:11+5:30
Gunaratna Sadavarte : आज ही कोठडी संपत असून गुणरत्न सदावर्ते यांना गिरगाव कोर्टात हजर करण्यात आले. सुनावणीला सुरुवात झाली आहे.

गुणरत्न सदावर्ते यांना गिरगाव कोर्टात केले हजर, सातारा पोलीस ताबा मागणार
मुंबई - एसटी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना शुक्रवारी राहत्या घरातून गावदेवी पोलिसांनी अटक केली होती. शनिवारी त्यांना मुंबईतील किला कोर्टात हजर करण्यात आले. सदावर्ते यांची बाजू जयश्री पाटील आणि इतर दोन वकिलांनी मांडली होती. हा युक्तिवाद संपल्यानंतर न्यायालयाने गुणरत्न सदावर्ते यांना 11 एप्रिलपर्यंत दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. आज ही कोठडी संपत असून गुणरत्न सदावर्ते यांना गिरगाव कोर्टात हजर करण्यात आले. सुनावणीला सुरुवात झाली आहे.
वकील गिरीश कुलकर्णी यांनी सदावर्ते यांची बाजू मांडत आहेत. दरम्यान सातारा पोलीस देखील गिरगाव कोर्टात दाखल झाले. सरकारी वकील प्रदीप घरत यांनी देखील त्यांची बाजू मांडत आहेत. घरत यांनी आंदोलक सदावर्ते यांच्या संपर्कात होते असा दावा केला आहे. यामध्ये आणखी चार जणांच्या कोठडीची मागणी केली आहे. यामध्ये एकजण पसार असल्याचेही सांगण्यात आले आहे. सदावर्ते तपासाला सहकार्य करत नाही. सातारा पोलीस अधिकारी भगवान निंबाळकर त्यांच्या पथकासह गिरगाव कोर्टात आले आहेत.
सदावर्ते यांच्यावर सातारा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असल्याने सातारा पोलीस गिरगाव कोर्टात हजर झाले आहेत. सातारा पोलिसांनी सदावर्ते यांचा ताबा मागितला आहे. छत्रपतींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी ऍड. सदावर्तेंवर साताऱ्यात गुन्हा दाखल आह. या प्रकरणी त्यांचा ताबा मागणार आहेत.