बोंबला! २७ वर्ष लहान महिलेसह लग्न, संबंध ठेवताना घेत होता चावा; न्यायालयाने दिले अटकेसह बत्तीशी काढून घेण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 02:25 PM2022-01-06T14:25:57+5:302022-01-06T14:26:25+5:30

Crime News : एका महिलेने पोलीस ठाण्यात आपल्या पतीविरोधात तक्रार नोंदवली होती.

gujrat jeweller did unnatural s e x with 27 years younger wife cut private part by teeth | बोंबला! २७ वर्ष लहान महिलेसह लग्न, संबंध ठेवताना घेत होता चावा; न्यायालयाने दिले अटकेसह बत्तीशी काढून घेण्याचे आदेश

बोंबला! २७ वर्ष लहान महिलेसह लग्न, संबंध ठेवताना घेत होता चावा; न्यायालयाने दिले अटकेसह बत्तीशी काढून घेण्याचे आदेश

Next

मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) इंदूरमध्ये (Indore) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डिसेंबर २०२१ च्या सुरुवातीला एका महिलेने पोलीस ठाण्यात आपल्या पतीविरोधात तक्रार नोंदवली होती. दरम्यान, आपला पती अनैसर्गिक संबंध ठेवत असल्याचं तिनं तक्रारीत म्हटलं होतं. यासोबतच तो पहिल्या रात्रीपासूनच सातत्यानं असं करत होता, तसंच संपूर्ण शरीरावर चावा घेत असल्याचंही महिलेनं तक्रारीत म्हटलं होतं. 

पीडित महिलेचा विवाह गुजरातच्या ६७ वर्षीय ज्वेलरसह झाला होता. महिला ही मूळ इंदूरची रहिवासी आहे. विवाहानंतर ती गुजरातमध्ये गेली. पतीपेक्षा ती २७ वर्षांनी लहान आहे. त्या महिलेचं हे दुसरं लग्न होतं. विवाहानंतर पती आपल्याला उदयपूर येथे नेलं. त्या ठिकाणीही त्यानं असं केलं. तसंच त्यानं बनावट दात लावले असल्याचंही महिलेनं सांगितलं.

जेव्हा आपण या कृत्याचा विरोध केला तेव्हा तेव्हा पतीनं आपल्याला धमकी दिली. तसंच आपल्याकडे भरपूर पैसे असून बड्या लोकांसोबतही ओळख असल्याचं तो सांगत होता, असं महिलेनं म्हटलं. परंतु डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीला महिला पळून जाण्यास यशस्वी ठरली आणि त्यानंतर तिनं इंदूरमध्ये याविरोधात तक्रार केली. त्या दोघांचाही विवाह २८ ऑक्टोबरला झाला होता.

धमकीही दिली
जर याबद्दल कुठेही वाच्यता केली तर संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची धमकी दिल्याचंही तिनं म्हटलं. यानंतर महिला घाबरली होती. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिच्या पतीच्या अटकेसाठी अनेक ठिकाणी छापे टाकले. पत्नीनं डिसेंबर महिन्यात त्याच्याविरोधात अनैसर्गिक संबंध प्रस्थापित करत असल्याची याचिका दाखल केली होती. महिलेनं न्यायालयासमक्ष तिच्या पतीनं केलेल्या कृत्यांमुळे झालेल्या जखमांचाही उल्लेख केला. हा गंभीर गुन्हा असल्याचं सांगत न्यायालयानं तिच्या पतीच्या अटकेचे आदेश पोलिसांना दिली. तसंच त्याची बत्तीशी जप्त करण्यासही सांगितलं आहे. आरोपी ७ डिसेंबरपासूनच फरार आहे.

Web Title: gujrat jeweller did unnatural s e x with 27 years younger wife cut private part by teeth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.