'तू माझ्यासोबत फार वाईट केलं, असं करायला नको होतं', व्हिडीओ रेकॉर्ड करून तरूणीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 11:25 AM2022-06-24T11:25:21+5:302022-06-24T11:25:45+5:30

Gujarat Nafisa Suicide Case : आयशाप्रमाणे बडोद्याच्या नफीसाने साबरमती रिव्हर फ्रंटवर आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यादरम्यान तिने एक व्हिडीओ बनवला होता. त्यानंतर तिने दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केला. शेवटी तिने मृत्यूला कवटाळलं.

Gujarat : Sabarmati riverfront Nafisa viral video before suicide | 'तू माझ्यासोबत फार वाईट केलं, असं करायला नको होतं', व्हिडीओ रेकॉर्ड करून तरूणीची आत्महत्या

'तू माझ्यासोबत फार वाईट केलं, असं करायला नको होतं', व्हिडीओ रेकॉर्ड करून तरूणीची आत्महत्या

googlenewsNext

Gujarat Nafisa Suicide Case : पतीवर सर्वात जास्त प्रेम करणाऱ्या गुजरातमधील आयशाचा  वेदनादायी अंत तुम्हाला आठवत असेलच. गुजरातमधील या तरूणीच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का दिला होता. पतीच्या त्रासाला कंटाळून आयशाने साबरमती नदीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. आता आयशाप्रमाणे बडोद्याच्या नफीसाने साबरमती रिव्हर फ्रंटवर आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यादरम्यान तिने एक व्हिडीओ बनवला होता. त्यानंतर तिने दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केला. शेवटी तिने मृत्यूला कवटाळलं.

नफीसाने आत्महत्येचा प्रयत्न करण्याआधी एक व्हिडीओ बनवला होता. यात तिने अहमदाबादच्या शेख रमीझ अहमदचा उल्लेख केला. प्रेमात दगा मिळाल्यानंतर तिने या व्हिडीओत तिची वेदना व्यक्त केली. यावेळी तिने दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केला आणि आपल्या घरी बडोद्याला परत गेली. 20 जूनला तिने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबियांनी जीपी रोड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांच्या चौकशीतून समोर आलं की, मृत्यूआधी तिने एक व्हिडीओ बनवला होता. 

हा व्हिडीओ तेव्हाचा आहे जेव्हा नफीसा अहमदाबादच्या साबरमती रिव्हर फ्रन्टवर आत्महत्या करायला गेली होती. पण करू शकली नाही. या व्हिडीओत ती म्हणते की, 'रमीझ...तू माझ्यासोबत फार वाईट केलं. असं करायला नको होतं. आयुष्यात मी सर्वात जास्त प्रेम तुझ्यावर केलं आणि तू माझ्यासोबत असं केलं? मला इतका मोठा दगा दिला. मला वाटलं, तू वेगळा आहे. पण तू सुद्धा इतरांसारखाच आहे. तुझ्यात आणि इतरांमध्ये काहीच फरक नाही. सगळ्या जगाला समजल्यानंतरही तू माझा हात हाती घेतला नाही. तू खूप वाईट आहे...'.

दरम्यान, अहमदाबादच्या आयशाने 25 फेब्रुवारी 2021 मध्ये साबरमती नदीत उडी मारून आत्महत्या केली होती. आत्महत्येआधी तिने एक व्हिडीओ बनवून आरिफला पाठवला होता. जो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात तिने तिचं त्याच्यावर किती प्रेम आहे हे सांगितलं होतं. पोलिसांनी आयशाचा पती आरिफला राजस्थानच्या पालीमधून अटक केली. याप्रकरणी कोर्टाने आरिफला 10 वर्षांची शिक्षा सुनावली.

Web Title: Gujarat : Sabarmati riverfront Nafisa viral video before suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.