ऐश्वर्या नाही तर सलमान खान या अभिनेत्रीसोबत थाटणार होता संसार, कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2024 11:00 AM2024-06-15T11:00:11+5:302024-06-15T11:01:03+5:30

बॉलिवूडचा दबंग खानच्या लग्नाबाबत बऱ्याच काळापासून चर्चा सुरू होत्या. ५८ वर्षीय सलमान खान(Salman Khan)ने अद्याप लग्न केले नाही.

If not Aishwarya, then Salman Khan was going to marry the actress, who is she? | ऐश्वर्या नाही तर सलमान खान या अभिनेत्रीसोबत थाटणार होता संसार, कोण आहे ती?

ऐश्वर्या नाही तर सलमान खान या अभिनेत्रीसोबत थाटणार होता संसार, कोण आहे ती?

बॉलिवूडचा दबंग खानच्या लग्नाबाबत बऱ्याच काळापासून चर्चा सुरू होत्या. ५८ वर्षीय सलमान खान(Salman Khan)ने अद्याप लग्न केले नाही आणि कदाचित तो आता कधीतरी लग्न करेल असे वाटते. मात्र, याआधी त्याला लग्न करावेसे वाटले नव्हते असे नाही. सलमान बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रेमात पडला होता आणि त्याला तिला आपली लाइफ पार्टनर बनवायची होती. पण गोष्ट कशी बिघडली आणि सलमान खान कोणाशी लग्न करू इच्छित होता. हे जाणून घेऊया.

सलमान खानच्या खासगी आयुष्यातील कहाणी कोणत्या फिल्मी स्टोरीपेक्षा कमी नाही. त्याच्या आयुष्यात अनेक अभिनेत्री आल्या आणि गेल्या, ज्यात त्याचे नाव अनेकांशी जोडले गेले. मात्र ९०च्या दशकात अभिनेत्री जुही चावला सोबत सलमानला लग्न करायचे होते. १९९२ मध्ये आयटीएमबीला दिलेल्या मुलाखतीत, अभिनेत्याने यावर मौन सोडले होते. तो म्हणाला की, मला तिच्याशी लग्न करायचे आहे, ती खूप छान आहे. पण तिचे वडील या लग्नासाठी तयार नाहीत. मी त्यांच्याशीही या विषयावर बोललो होतो. पण त्यांना काय हवे आहे ते मला माहीत नाही, ते यासाठी तयार नाहीत. 

जुहीने जय मेहता यांच्यासोबत केलं लग्न
अशाप्रकारे सलमान खानने जुही चावलासोबतच्या लग्नाबाबत आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. यानंतर बिग बॉस शोमध्येही सलमानने जुहीसमोर याचा खुलासा केला होता. १९९५ मध्ये जुही चावलाने बिझनेसमन जय मेहताशी लग्न केले.

सलमान आणि जुही या सिनेमात केलंय काम
जुही चावलने शाहरूख खानने बऱ्याच सिनेमात काम केले आहे. मात्र सलमान खानसोबत दीवाना मस्तानामध्ये ती दिसली होती. खरेतर या सिनेमात सलमानचा केमिओ होता. 

Web Title: If not Aishwarya, then Salman Khan was going to marry the actress, who is she?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.