Gujarat Crime: गुजरातच्या राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शक्तीसिंह गोहिल यांचे पुतणे यशराज गोहिल यांनी टोकाचे पाऊल उचलत आधी पत्नीची हत्या केली आणि नंतर स्वतःचे जीवन संपवले. महत्त्वाचे म्हणजे, अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच या दांपत्याचा विवाह झाला होता.
रात्रीच्या जेवणानंतर होत्याच्या नव्हतं झालं
मिळालेल्या माहितीनुसार, यशराज गोहिल हे गुजरात मॅरिटाइम बोर्डात अधिकारी म्हणून कार्यरत होते. मूळचे भावनगरचे असलेले यशराज आणि राजेश्वरी जडेजा (वय ३०) या दोघांचेही हे दुसरे लग्न होते. दोन महिन्यांपूर्वीच विवाहबंधनात अडकलेले हे जोडपे अहमदाबादमध्ये स्थायिक झाले होते. मंगळवारी रात्री हे दोघेही बाहेर जेवायला गेले होते. तिथून परतल्यानंतर घरात काहीतरी वाद झाला आणि रागाच्या भरात यशराज यांनी परवानाधारक बंदुकीतून राजेश्वरी यांच्या डोक्याच्या मागील बाजूस गोळी झाडली.
पत्नीच्या मृत्यूनंतर स्वतःवरही झाडली गोळी
गोळीबाराचा आवाज ऐकून परिसरात घबराट पसरली. माहिती मिळताच आपत्कालीन वैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झाले. डॉक्टरांनी तपासून राजेश्वरी यांना मृत घोषित केले. धक्कादायक बाब म्हणजे, वैद्यकीय पथक तिथून निघून गेल्यानंतर काही वेळातच यशराज यांनी त्याच शस्त्राने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली.
पोलिसांकडून तपास सुरू
अहमदाबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले आहेत. प्राथमिक तपासात ही कौटुंबिक वादातून घडलेली घटना असल्याचे दिसत असले, तरी इतक्या टोकाच्या पावलामागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. यशराज यांनी घरात परवानाधारक शस्त्र का आणि कसे ठेवले होते, याचाही तपास पोलीस करत आहेत.
खासदार शक्तीसिंह गोहिल यांच्या कुटुंबाशी संबंधित ही घटना असल्याने गुजरातमध्ये या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. दोन महिन्यांपूर्वी सुरू झालेला संसार अशा प्रकारे रक्ताने माखल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
Web Summary : In Gujarat, a Congress MP's nephew, Yashraj Gohil, killed his wife, Rajeshwari, shortly after their marriage. Following a dispute, he shot her and then committed suicide with the same licensed gun. Police are investigating the motive behind this tragic event.
Web Summary : गुजरात में कांग्रेस सांसद के भतीजे यशराज गोहिल ने शादी के कुछ समय बाद पत्नी राजेश्वरी की हत्या कर दी। विवाद के बाद, उन्होंने उसे गोली मार दी और फिर उसी लाइसेंसी बंदूक से आत्महत्या कर ली। पुलिस मामले की जांच कर रही है।