आजोबांनी पाहिलं तर काय नात पंख्याला लटकलेली; लग्नाच्या वरातीऐवजी तिची निघाली अंत्ययात्रा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 15:37 IST2021-05-17T15:35:35+5:302021-05-17T15:37:45+5:30
Suicide News : पोलिसांनी मृतदेह खाली काढून ताब्यात घेतला आणि हा मृतदेह कांवटिया रुग्णालयात शवविच्छेदनसाठी पाठवला.

आजोबांनी पाहिलं तर काय नात पंख्याला लटकलेली; लग्नाच्या वरातीऐवजी तिची निघाली अंत्ययात्रा
राजधानी हरमाडा भागात एका युवतीने घरात फास लावून आपले जीवन संपवले. सकाळी मृताच्या आजोबांनी पाहिले तेव्हा ही तरूणी पंखावर लटकलेली आढळली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच हरमाडा पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेह खाली काढून ताब्यात घेतला आणि हा मृतदेह कांवटिया रुग्णालयात शवविच्छेदनसाठी पाठवला.
Tauktae Cyclone: पहिला बळी; राममंदिराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी
मिळालेल्या माहितीनुसार मृताचे नाव पूजा कुमावत असे आहे. मृतक आपल्या आजोबांजवळ राहत होता. आजारपणामुळे तिचे पालक आधीच मरण पावले आहेत. मृत मुलीचा साखरपुडा झाला होता. २६ मे रोजीलग्न ठरले होते. मृत मुलीच्या लग्नाची वरात निघण्याऐवजी अंत्ययात्रा निघाली. मात्र, आत्महत्येमागील कारण पुढे आले नाही.
या प्रकरणाचा तपास हरमाडा पोलीस करत आहेत. इकडे या घटनेनंतर मृताच्या नातेवाईकांना अश्रू अनावर झाले आहेत. त्यांना समजत नाही की ज्या मुलीची मुलगी 10 दिवसानंतर लग्नासाठी वरात निघणार होती; तिची अंत्ययात्रा निघत आहे. त्याचबरोबर मृताच्या सासरच्या लोकांमध्येही शोकाचे वातावरण आहे.