शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
2
होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... 
3
'पीएम किसान'चे २,००० रुपये खात्यात जमा होण्यासाठी 'या' ३ अटी पूर्ण करणे अनिवार्य; मोबाईलवरुनही प्रोसेस होईल
4
अमेरिकेचे F-35 विमान इराणने पाडले! १५ दिवसांत दुसऱ्या फायटर जेटचा गेम; युद्धभूमीवर खळबळ
5
आता इंधनाबरोबरच खतांचं टेन्शनही संपणार! संकट काळात 'खास मित्र' भारताच्या मदतीला, PM मोदींना भेटून दिलं मदतीचं आश्वासन
6
वर्षभरानंतर सतीश भोसले उर्फ 'खोक्या' तुरुंगाबाहेर; मारहाण प्रकरणात न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
7
Top Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
हृदयद्रावक! गॅस टंचाईमुळे अनेक रेस्टॉरंट्स बंद; काम न मिळाल्याने शेफची आत्महत्या
9
एक युद्धनौका, एक अण्वस्त्रवाहू पाणबुडी...! दोन्ही शिकारी जगापासून अदृष्यच राहणार, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची पोस्ट अन् चीन, पाकिस्तानात खळबळ... 
10
पाकिस्तानला दुबईचा दणका! १७ एप्रिलपर्यंत २ अब्ज डॉलर्स परत करा; युएईच्या अल्टिमेटमने शाहबाज शरीफ सरकार हादरले
11
आपने केलेल्या कारवाईनंतर पहिल्यांदाच बोलले राघव चड्डा, म्हणाले, ‘’माझ्या मौनाला…” 
12
"होर्मुझमध्ये फक्त आमचेच नाविक मारले गेले..."; ६० देशांच्या बैठकीत भारत स्पष्टच बोलला, दिला मोठा इशारा!
13
सोने-प्लॅटिनमच्या आयातीवर कडक निर्बंध! आता 'लायसन्स'शिवाय इंपोर्ट अशक्य; दागिन्यांच्या किमती वाढणार?
14
भारत-पाकिस्तानच्या पडद्याआड चर्चा सुरू! 'ट्रॅक-2' बैठकीत दोन्ही देश आमनेसामने, कारण काय...
15
Numerology: तुमचा स्वभाव 'बोल्ड' आहे की लाजाळू? जन्मतारखेनुसार ओळखा बलस्थान,व्यक्तिमत्त्वाला द्या झळाळी!
16
नाशिकमध्ये हायप्रोफाईल ब्लॅकमेलिंग; जेष्ठ व्यक्तीच्या टॅबमधील 'त्या' अश्लील व्हिडिओसाठी १२ लाखांची खंडणी
17
Ashok Kharat : "कुटुंबात वाईट घटना, मृत्यूची भीती"; खरातने लाखो रुपये उकळलेले, कवडीमोल भावात जमीन खरेदी
18
मोठी घडामोड! होर्मुज मार्ग खुला करण्याच्या प्रस्तावाला चीनने विरोध केला; UN मध्ये मतदान होऊ शकले नाही, उद्यावर ढकलले...
19
टिंडरवर मैत्री, भेटायला बोलावलं; जेवताना ती म्हणाली बाथरूममध्ये जा, बाहेर येताच तरुणाचा खेळ खल्लास!
20
हे भगवान! ५०१ रुपयांचं 'यंत्र' विकत घेतलं, १० वर्षं देवघरात पूजा केली; Reel पाहून उघडलं तेव्हा धक्काच बसला!
Daily Top 2Weekly Top 5

बर्थडे पार्टीत गोळीबार आणि 'त्या' ब्लॅकमेलिंगचा पर्दाफाश; अंशिकाचं खळबळजनक 'सत्य'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 19:13 IST

गोरखपूरमध्ये एका वाढदिवसाच्या पार्टीतून सुरू झालेला वाद आता एका खळबळजनक गुन्हेगारी घटनेत बदलला आहे.

गोरखपूरमध्ये एका वाढदिवसाच्या पार्टीतून सुरू झालेला वाद आता एका खळबळजनक गुन्हेगारी घटनेत बदलला आहे. ज्या तरुणीवर गोळीबार आणि खंडणीचा आरोप आहे, ती सध्या जेलमध्ये आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे काही खुलासे समोर आले आहेत, ज्यांनी संपूर्ण शहर हादरलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणी अंशिका सिंह सध्या न्यायालयीन कोठडीत असून तिच्याविरुद्ध नोंदवलेल्या गुन्ह्याचा तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २० जानेवारी रोजी अंशिका आपल्या मित्रांसोबत वाढदिवस साजरा करत होती. याच दरम्यान एका खासगी रुग्णालयाच्या मॅनेजरसोबत तिचा वाद झाला. अंशिकाने पिस्तूल काढून त्याला घाबरवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या झटापटीत मॅनेजरच्या मित्राच्या पोटात गोळी लागली. त्याला गंभीर अवस्थेत एम्स (AIIMS) रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेनंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या गर्दीने अंशिका आणि तिच्या साथीदारांना पकडून पोलिसांच्या हवाली केले. अटकेनंतर पोलिसांनी जेव्हा अंशिकाचा मोबाईल आणि डिजिटल रेकॉर्ड तपासला, तेव्हा अनेक धक्कादायक तथ्ये समोर आली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबाईलमध्ये असे काही व्हिडिओ आणि कॉल रेकॉर्ड आढळले आहेत, ज्यावरून ती व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून लोकांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत असल्याचे संकेत मिळतात. मात्र, याप्रकरणी अद्याप कोणत्याही व्यक्तीने लेखी तक्रार नोंदवलेली नाही.

द्विवेदी चाईल्ड केअर हॉस्पिटलचे मॅनेजर विशाल मिश्रा यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या आरोपानुसार, अंशिका आणि तिचा साथीदार बंटी वर्मा यांनी त्यांना पिस्तूल दाखवून आधी १२ हजार रुपये आणि नंतर ५० हजार रुपयांची मागणी केली होती. पैसे न दिल्यास खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकीही देण्यात आली होती. अंशिकाचं नाव यापूर्वी वाहन चोरी आणि बनावट नंबर प्लेट प्रकरणातही समोर आलं आहे. 

तपासात असंही निष्पन्न झालं आहे की, दिल्लीतून भाड्याने घेतलेली गाडी परत न करणं आणि त्यावर वेगवेगळ्या राज्यांच्या नंबर प्लेट लावून ती वापरल्याचा आरोपही तिच्यावर आहे. पोलीस आता मोबाईल डेटा, कॉल डिटेल्स, आर्थिक व्यवहार आणि सोशल मीडिया हालचालींच्या आधारे संपूर्ण नेटवर्कचा तपास करत आहेत. पुढील कारवाई लोकांच्या तक्रारी आणि डिजिटल पुराव्यांवर अवलंबून असेल, असं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Birthday Shooting Exposes Blackmail: Anshika's Shocking Truth Unveiled

Web Summary : A birthday party shooting in Gorakhpur led to the arrest of Anshika Singh. Investigations revealed blackmailing via video calls and extortion attempts. She's also accused of vehicle theft and using fake number plates. Police are investigating her network based on digital evidence.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस