अलविदा...माझ्या मुलाची काळजी घ्या! फेसबुक लाईव्ह करून विवाहितेने ट्रेनसमोर केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 19:23 IST2022-02-25T19:21:51+5:302022-02-25T19:23:16+5:30
Suicide Case : फेसबुकवर लाईव्ह पाहून कुटुंबीय आणि अन्य लोक तिला वाचवण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर पोहोचले, मात्र तोवर उशीर झाला होता.

अलविदा...माझ्या मुलाची काळजी घ्या! फेसबुक लाईव्ह करून विवाहितेने ट्रेनसमोर केली आत्महत्या
जयपूर - राजस्थानातील पाली येथे एका विवाहितेने ट्रेनसमोर येत आत्महत्या केली. मृत्यूपूर्वीफेसबुकवर लाईव्ह करत तिने आपली समस्या शेअर केली. तब्बल ९ मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये महिलेने संपत्ती वाद आणि मुलाच्या ब्लड कॅन्सरचे कारण सांगितलं. फेसबुकवर लाईव्ह पाहून कुटुंबीय आणि अन्य लोक तिला वाचवण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर पोहोचले, मात्र तोवर उशीर झाला होता.
पोलीस ठाण्याचे प्रमुख रविंद्र सिंह यांनी सांगितलं की, हाऊसिंग बोर्ड येथे राहणारी महिला राठोड (34) हिने गुरुवारी रात्री केरला स्टेशनवरील सूर्यनगरी एक्सप्रेसच्या समोर येऊन आत्महत्या केली. महिलेने आत्महत्येपूर्वी फेसबुक लाईव्ह केले. लाइव्हमध्ये तिने सांगितलं की, माझ्या ८ वर्षांच्या मुलाला ब्लड कॅन्सर झाला आहे. वडिलांचाही मृत्यू झाला आहे. आई-वडिलांची संपत्ती भाऊ आणि बहिणीने स्वत:च्या नावावर करून घेतली आहे. मुलाच्या उपचारासाठी मला स्वत:च घर विकावं लागलं, आता मी भाड्याच्या घरात राहते. भाऊ-बहिणींनी मला साथ दिली नाही. आता मला सहन होत नाही, अलविदा...माझ्या मुलाची काळजी घ्या!
गतिमंद मुलीवर बलात्कार, अर्धांगवायू झालेल्या तिच्या आईच्यासमोरच नराधमाने केले दुष्कृत्य
महिलेच्या पतीने संगितलं की, गुरुवारी सायंकाळी मुलाला माझ्याकडे दुकानात सोडून ती एकटी स्कूटी घेऊन निघून गेली. फेसबुक लाईव्हवर पाहिल्यानंतर ती रेल्वे ट्रॅकवर असल्याची माहिती मिळाली. अनेक कारणांमुळे आणि अडचणींमुळे ती नैराश्यात होती. ३ वर्षांपूर्वीही तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यावेळी तिने माहेरच्या घराच्या छतावरून उडी मारली होती. पुन्हा गुरुवारी सायंकाळी एक फेसबुक पोस्ट देखील केली होती. या पोस्टमध्ये तिने आपल्या मृत्यूसाठी भाऊ-बहीण जबाबदार असल्याचं सांगितलं आहे. पोलीस या प्रकरणात तपास करीत आहे.