शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

गोंदिया हत्याकांडात मृत कुुटंबातील तरुणीवर सर्वाधिक वार, मारेकऱ्याचा टार्गेट होती पोर्णिमा  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 11:30 PM

Crime News: गोंदिया जिल्हा हादरवून सोडणाऱ्या एकाच कुटुंबातील चाैघांच्या मृत्यू प्रकरणात बिसेन कुटुंबातील पोर्णिमा नामक तरुणी निर्दयतेचा बळी ठरली आहे.

- नरेश डोंगरे  नागपूर - गोंदिया जिल्हा हादरवून सोडणाऱ्या एकाच कुटुंबातील चाैघांच्या मृत्यू प्रकरणात बिसेन कुटुंबातील पोर्णिमा नामक तरुणी निर्दयतेचा बळी ठरली आहे. मारेकऱ्यांनी तिच्यावर लोखंडी रॉडने अनेक फटके मारून तिचा चेहरा पुरता बिघडवला आहे. त्यावरून मारेकऱ्याचे टार्गेट पोर्णिमा होती, हे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, या प्रकरणाचे अनेक पैलू दोन दिवसांत पुढे आले असले तरी पोलीस या संबंधाने उघडपणे काही जाहिर करण्याचे टाळत आहेत.

अमाणूषतेचा कळस गाठणारी चुरडी- तिरोडा (जि. गोंदिया) येथील ही घटना मंगळवारी, २१ सप्टेंबरला उघडकीस आली. शिर्षस्थ पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बिसेन कुटुंबाचा प्रमूख रेवचंदचा गळफास लावलेला आणि त्याची पत्नी मालता, मुलगी पोर्णिमा तसेच तेजस हे तिघे रक्ताच्या थारोळ्यात पडून होते. पुढे रेवचंद वगळता तिघांच्या डोक्यावर लोखंडी वस्तूने प्रहार करून त्यांची हत्या केल्याचे आणि रेवचंदचा गळफासामुळे मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी वैद्यकीय अहवालातून स्पष्ट केले आहे. वैद्यकीय अहवालानुसार, आरोपीने सर्वाधिक लोखंडी रॉडचे फटके बिसेन कुटुंबातील पोर्णिमा हिच्यावर हाणले आहेत. तिचा संपर्ण चेहराच आरोपीने बिघडवला आहे. त्यातून पोर्णिमावर आरोपीचा सर्वाधिक राग होता, असा अंदाज पोलीस अधिकाऱ्यांनी काढला आहे. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी या चाैघांचे मृतदेह आढळले त्या खोलीचे दार आतून लावून होते.

घरात शिरण्याचा वरचा मार्ग म्हणजे जिना. या जिन्यावरील कुंड्याही दाटीवाटीने ‘जैसे थे’च ठेवून होत्या. त्याचप्रमाणे श्वान पथक, ठसे तज्ज्ञ आणि एकूणच परिस्थितीजन्य पुरावे या घटनेचा आरोपी म्हणून मृतकाशी संबंधित व्यक्तीकडेच अंगुलीनिर्देश करीत आहेत. मात्र, आरोपीबाबतचा अहवाल जाहिर करण्याऐवजी पोलिसांनी चारही मृतदेहांचे व्हिसेरा प्रिझर्व्ह करून नागपूरच्या रासायनिक प्रयोगशाळेत पाठविले आहेत. तो अहवाल आल्यानंतरच आम्ही या प्रकरणाबाबत काही ठोसपणे सांगू, असे गोंदियाचे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी लोकमतला सांगितले आहे.

 तिघे जेवले, रेवचंद उपाशीचवैद्यकीय अहवालानुसार, तेजस, पोर्णिमा आणि त्यांची आई मालता हे तिघेही घटनेच्या पूर्वी जेवले. रेवचंदच्या पोटात केवळ पाणी आढळले. अर्थात त्याने त्या रात्री जेवणही घेतले नव्हते, हे स्पष्ट झाले आहे. जेव्हा की शिजविलेले भरपूर अन्न फ्रीजमध्ये ठेवून होते.वरिष्ठांनी मागून घेतला चाैकशी अहवालगोंदिया जिल्ह्याच्या या घटनेची चर्चा सर्वत्र पसरली आहे. या हत्याकांडाचा आरोपी कोण ते जाणून घेण्यासाठी नागपूर-मुंबईतील वरिष्ठांकडूनही गोंदिया पोलिसांना विचारणा झाली आहे. या पार्श्वभूमीवर, गोंदिया-गडचिरोली परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनीही गोंदिया पोलीस प्रशासनाकडून आतापर्यंतचा चाैकशी अहवाल मागून घेतला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी