घरफोडी करून पावणेसोळा लाखांचा ऐवज लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2019 15:10 IST2019-07-31T15:07:00+5:302019-07-31T15:10:04+5:30
चोरांनी घरातील ५० तोळे सोने व चांदीचे दागिने तसेच रोकड लंपास केली...

घरफोडी करून पावणेसोळा लाखांचा ऐवज लंपास
पिंपरी : दरवाजाला लावलेले कुलूप तोडून घरातील ५० तोळे सोने व चांदीचे दागिने तसेच रोकड लंपास केली. चोरट्यांनी १५ लाख ८७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. चिंचवड येथील लिंक रोड येथे सोमवारी (दि. २९) दुपारी दीड ते मंगळवारी (दि. ३०) सकाळी सव्वादहाच्या दरम्यान ही घरफोडी झाली. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मीनाक्षी किसनराव बागडे (वय ५२, रा. लिंक रोड, चिंचवड) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादी बागडे यांच्या फ्लॅटचा दरवाजा कुलूप लावून बंद असताना अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. ५० तोळे सोने व चांदीचे दागिने तसेच रोकड असा एकूण १५ लाख ८७ हजारांचा ऐवज चोरट्यांनी घरातून लंपास केला. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.