girlfriend took poison in a moving car; Scared lover drove her for six hours | चालत्या कारमध्ये प्रेयसीने विषप्राशन केले; घाबरून प्रियकराने सहा तास तसेच फिरवले
चालत्या कारमध्ये प्रेयसीने विषप्राशन केले; घाबरून प्रियकराने सहा तास तसेच फिरवले

शिमला : प्रियकरासोबत चालत्या कारमध्ये विषप्राशन करून प्रेयसीने केली आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही महिला एका खासगी हॉस्पिटलमध्ये नर्स होती. मंगळवारी रात्री सुन्नी पोलिसांना एका हॉस्पिटलमधून महिलेला मृतअवस्थेत दाखल केल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी कारच्या चालकाला ताब्यात घेतले आहे. 


बुधवारी पोलिसांनी या महिलेचा मृतदेह तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिला. तर न्यायालयाने चालकाला पोलिस कोठडीत पाठविले आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात महिलाने विष प्राशन करत आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे. आरोपी हा चालक म्हणून काम करतो. दोघांमध्ये जवळपास तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. 


पोलिसांच्या चौकशीदरम्यान आरोपीने सांगितले की, संध्याकाळी सव्वापाचच्या सुमारास महिलेने प्रियकर चालकाला बोलावले होते. दोघेही कारमध्ये बसले आणि पुढे निघाले. काही अंतर गेल्यानंतर महिलेने काचेची बॉटल काढली आणि त्यातील विषारी पदार्थ प्राशन केला. त्याने गाडी थांबवेपर्यंत महिलेने सर्व बॉटल रिकामी केली होती. चालकाने घाबरून तशीच गाडी पुढे नेली आणि रात्री एकच्या सुमारास सुन्नी हॉस्पिटलमध्ये तिला उपचारासाठी आणले. 


मात्र डॉक्टरांनी या महिलेला मृत घोषित केले. डॉक्टरांनुसार महिलेचा हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याआधीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी सांगितले की ,चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिस चौकशी सुरू आहे.

Web Title: girlfriend took poison in a moving car; Scared lover drove her for six hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.