शौचालयास गेलेल्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून केली बेदम मारहाण 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 07:40 PM2021-10-16T19:40:16+5:302021-10-16T19:40:59+5:30

Gangrape Case : ही घटना 14 ऑक्टोबर रोजी दुपारी घडल्याचे सांगितले जात आहे.

A girl who went to the toilet was gang-raped and beaten to death | शौचालयास गेलेल्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून केली बेदम मारहाण 

शौचालयास गेलेल्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून केली बेदम मारहाण 

Next
ठळक मुद्दे14 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 च्या सुमारास ती घराजवळील जंगलात शौचासाठी गेली होती.

सवाई माधोपूर: राजस्थानमधील मलारणा डुंगर पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात, जंगलात शौच करण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचे प्रकरण समोर आले. ही घटना 14 ऑक्टोबर रोजी दुपारी घडल्याचे सांगितले जात आहे.

रात्री उशिरा या घटनेबद्दल पीडितेने नातेवाईकांसह पोलीस स्टेशन गाठले आणि घाबरलेल्या पीडितेने पोलिसांना आपबिती सांगितली, ज्यावर पोलिसांनी आरोपींविरोधात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 वर्षीय पीडितेने तक्रार दिला आणि सांगितले की, 14 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 च्या सुमारास ती घराजवळील जंगलात शौचासाठी गेली होती. मग आरोपी मजहरचा मुलगा नजर, मुजाहिदचा मुलगा मंजूर, अल्ताफचा मुलगा नवाब हे सर्व राहणारे पिलवा नदी पोलीस स्टेशन मलारना डुंगर, आधीच जंगलात लपून बसलेले. नंतर पीडितेला जबरदस्तीने पकडले. पीडितेने सांगितले की, आरोपी मजहर आणि मुजाहिदने तिच्यासोबत आळीपाळीने बलात्काराची घटना घडवली. पीडितेने विरोध केल्यावर आरोपी अल्ताफने तिचे तोंड बंद केले आणि तिला मारहाण केली. त्याचवेळी तिने कोणाला याबाबत सांगितले तर जीवे मारण्याची धमकी दिली.

बलात्काराच्या घटनेनंतर पीडित मुलगी कशी तरी तिच्या घरी पोहोचली. घाबरलेल्या पीडितेने गुरुवारी संध्याकाळी तिच्या पालकांना घटनेची माहिती दिली. नंतर पोलिसांनी रात्री उशिरा कुटुंबासह पोलीस स्टेशन गाठलेल्या पीडितेच्या तक्रारीवर गुन्हा दाखल केला.

पोलीस तपासात गुंतले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेने दिलेल्या अहवालात तीन आरोपींची नावे होती. सध्या पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून आरोपींविरोधात सामूहिक बलात्कारासह मारहाणीच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पीडितेची सवाई माधोपूर जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली. त्याचबरोबर सीओ सिटी कृष्णा सावरिया या प्रकरणाचा तपास करत आहेत.

 

 

Web Title: A girl who went to the toilet was gang-raped and beaten to death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app