शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
3
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
4
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
5
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
6
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
7
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
8
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
9
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
10
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
11
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
12
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
13
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
14
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
15
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
16
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
17
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
18
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
19
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
20
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...

फळविक्रेत्या मुलीवर अत्याचार; तरुणी ५ महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर फुटलं बिंग, वसईतील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 6:54 PM

आरोपीला तेलंगणा (हैदराबाद) येथुन घेतलं ताब्यात

- आशिष राणे

वसई- वसई रोड रेल्वे स्थानकात हमाली करणाऱ्या तरुणाने एका (२१) वर्षे तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करून पळालेल्या आरोपीला वसई रोड लोहमार्ग पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे या आरोपींला वसई रोड लोहमार्ग पोलिसांच्या पथकाने तीन महिन्यांच्या अथक परिश्रमाने थेट तेलंगणा (हैदराबाद ) राज्यांतून वरून ताब्यात घेतले आहे. शेष प्रसाद उर्फ दीपू हिरालाल पांडये (२८) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो मूळचा मध्यप्रदेश राज्यातील रहिवासी आहे.

लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेष प्रसाद हा वसई रोड रेल्वे स्टेशन परिसरात हमालीचे काम करत होता. दरम्यानच्या काळात ( डिसेंबर २०२० ) त्याची एका (२१) वर्षीय फळविक्रेती तरूणी सोबत ओळख झाली होती आणि त्या ओळखीचे मैत्रीत रूपांतर झालं होतं.अधून मधूनच्या भेटीत हमालाने तिला लग्नाचे आमिष दाखवून सतत तिचे लैंगिक शोषण केलं होतं. मात्र हे सर्व सुरु असताना अखेरीस ती तरुणी ५ महिन्यांची गरोदर माता असल्याचं उघड झाल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. दरम्यान या प्रकाराने हादरून गेलेल्या तरुणीच्या कुटुंबीयांनी वसई रोड लोहमार्ग पोलिस ठाणे गाठलं आणि पोलिसांना सर्व हकीकत कथन केल्यावर रेल्वे पोलिसांनी दि. २६ जुलै २०२१ रोजी आरोपी विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. 

परिणामी गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाल्यावर आरोपी शेष प्रसाद फरार झाला होता. मात्र तरीही रेल्वे पोलिस आरोपीचा शोध घेतच  होते तो सातत्याने त्याचे ठिकाण व मोबाईल नंबर बदली करायचा मात्र शेवटी मागील आठवड्यात रेल्वे पोलिसांना आरोपी शेष प्रसाद हा त्याच्या मूळ गावी असल्याची माहिती प्राप्त झाली होती. मात्र आरोपींला तिथे ही वसई रोड रेल्वे पोलिसांची कुणकुण लागताच तिथून ही तो फरार होऊन दुसऱ्या राज्यात जाण्यास यशस्वी झाला होता. परंतु पुन्हा रेल्वे पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेत आणि आपल्या गुप्त बातमीदारा मार्फत तांत्रिक सहाय्य व वेषांतर करून आरोपीच्या दुसऱ्या मोबाईलचे लोकेशन शोधून अखेर त्याचा ठावठिकाणा शोधून काढला आणि चार दिवसांपूर्वी त्याला तेलंगणा (हैदराबाद) शहरातुन त्याच्या मुसक्या आवळल्याचे पोलिसांनी सांगितले. वसई रोड लोहमार्ग पोलिस आणि त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या उत्तम कामगिरीमुळे सर्वत्र पोलिसांचे कौतुक केलं जातं आहे.

आरोपीला पोलीस कोठडी

रेल्वे पोलिस आरोपींला वसईत घेऊन आले असता आरोपींला कोर्टात हजर केल्यावर त्यास  दि. १६ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळVasai Virarवसई विरार