वांद्र्यातील बॅण्डस्टॅण्ड येथे तीन मित्रांनी मैत्रिणीवर केला सामूहिक बलात्कार; मैत्रीच्या नात्याला फासला काळिमा 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 07:07 PM2021-05-15T19:07:50+5:302021-05-15T19:10:44+5:30

Girl gang-raped by three friends at Bandstand : अलीकडेच वांद्रे येथील बीकेसी परिसरात देखील महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ माजली होती. 

Girl gang-raped by three friends at Bandstand in Bandra; Disgrace to friendship | वांद्र्यातील बॅण्डस्टॅण्ड येथे तीन मित्रांनी मैत्रिणीवर केला सामूहिक बलात्कार; मैत्रीच्या नात्याला फासला काळिमा 

वांद्र्यातील बॅण्डस्टॅण्ड येथे तीन मित्रांनी मैत्रिणीवर केला सामूहिक बलात्कार; मैत्रीच्या नात्याला फासला काळिमा 

Next
ठळक मुद्देगोवंडी परिसरात राहणाऱ्या तरुणीला तीन मित्रांनी बॅण्डस्टॅण्ड येथे आणले. हे चौघे दोन मोटारसायकलवरून आले.तीन आरोपी आणि पीडित एकमेकांना चांगलं ओळखतात.  मैत्रिचा फायदा घेत आरोपींनी हे धक्कादायक कृत्य केलं आहे. 

मुंबईत सध्या ब्रेक द चेन म्हणजेच कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी जारी असताना, बऱ्याच ठिकाणी माणसांची वर्दळ कमी झाली आहे. याचाच फायदा घेऊन वांद्रे येथील बॅण्डस्टॅण्ड परिसरात एका तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. आरोपी तरुण हे पीडितेच्या ओळखीचे असून चांगले मित्र आहेत. अलीकडेच वांद्रे येथील बीकेसी परिसरात देखील महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ माजली होती. 

मंगळवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास वांद्रे येथील बॅण्डस्टॅण्ड परिसरात तीन मित्रांनी संगनमत करून आपल्याच मैत्रिणीवर सामूहिक बलात्कार केला आहे. ही धक्कादायक घटना बॉलिवूडमधील प्रसिद्ध स्टारच्या घरासमोर घडल्याची माहिती समोर येत आहे. संबंधित आरोपी हे १९ ते २१ या वयोगटातील असून वांद्रे पोलिसांनी तीनही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. सध्या तीनही आरोपींची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.

 

मुंबईत खळबळ! महिलेचे लैंगिक शोषण करून गळा चिरून हत्या; नाल्यात आढळला मृतदेह 

 

गोवंडी परिसरात राहणाऱ्या तरुणीला तीन मित्रांनी बॅण्डस्टॅण्ड येथे आणले. हे चौघे दोन मोटारसायकलवरून आले. मुलीला बॅण्डस्टॅण्ड येथील समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या खडकांत नेऊन सामूहिक बलात्कार केला. नंतर तिला तिच्या घरी नेऊन सोडले. मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिच्या बहिणीने विचारपूस केली तेव्हा पीडित तरुणीने आपबिती सांगितली. त्यांनतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भादंवि ३७६ (ड) अन्वये गुन्हा दाखल केला. गुन्हा वांद्रे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने नंतर तिथे ट्रान्सफर करण्यात आला. तीन आरोपी आणि पीडित एकमेकांना चांगलं ओळखतात.  मैत्रिचा फायदा घेत आरोपींनी हे धक्कादायक कृत्य केलं आहे. 

 

Web Title: Girl gang-raped by three friends at Bandstand in Bandra; Disgrace to friendship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app