किचनमधून उडी मारून विद्यार्थिनीने केली आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 21:17 IST2018-08-07T21:16:55+5:302018-08-07T21:17:26+5:30

याप्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र, आत्महत्या का केली याबाबत अद्याप कारण कळलेले नाही

The girl committed suicide by jumping from the kitchen | किचनमधून उडी मारून विद्यार्थिनीने केली आत्महत्या 

किचनमधून उडी मारून विद्यार्थिनीने केली आत्महत्या 

मुंबई - २१ वर्षीय शीख विठ्ठल शेट्टी या विद्यार्थिनीने घरातील किचनमधून उडी मारून आत्महत्या केली आहे. काल मध्यरात्री हि घटना घडली असून याप्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र, आत्महत्या का केली याबाबत अद्याप कारण कळलेले नाही. 

बोरिवलीतील राजेंद्र नगर येथील एकटा भूमी सोसायटीच्या १६ मजल्यावर राहणाऱ्या विठ्ठल शेट्टी यांच्या मुलीने मध्यरात्री किचनमधून उडी मारून आत्महत्या केली. पहाटे इमारतीतील रहिवाश्याने रक्तबंबाळ अवस्थेत शीखाला पहिले आणि एकाच खळबळ उडाली. नंतर पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

Web Title: The girl committed suicide by jumping from the kitchen