जीवघेणा शेवट! जिच्यावर प्रेम केलं, तिचे आधीच होते २ बॉयफ्रेंड; सत्य समजताच 'तो' हादरला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 13:14 IST2026-01-14T13:13:07+5:302026-01-14T13:14:49+5:30
एका प्रेमप्रकरणाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

AI फोटो
उत्तर प्रदेशातील लखीमपुर खेरी येथील भीरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका प्रेमप्रकरणाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. ४० वर्षीय सुजीत मिश्रा याचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. असा आरोप आहे की, प्रेयसीचे आधीच दोन बॉयफ्रेंड होते, ज्याबद्दल सुजीतला कल्पना नव्हती. या तिघांनी मिळून सुजीतचा इतका छळ केला की, त्याने अखेर टोकाचं पाऊल उचललं.
सुजीत मिश्राचे आपल्याच भागातील रुबी नावाच्या मुलीशी प्रेमसंबंध होते. मात्र रुबीचे आधीपासूनच इतर दोन तरुणांशी संबंध होते, ही बाब सुजीतपासून लपवून ठेवण्यात आली होती. त्यानंतर रुबी आणि तिच्या दोन साथीदारांनी मिळून सुजीतवर दबाव टाकण्यास सुरुवात केली. मानसिक छळ, धमक्या आणि अपमानाचं सत्र सुरूच राहिलं.
सुजीतला जगणं कठीण झालं होतं. सुजीतने प्रथम '११२' क्रमांकावर फोन करून आपण विष पिणार असल्याचं सांगितलं. त्यानंतर त्याने पोलीस अधीक्षकांनाही फोन करून घटनेची माहिती दिली. सध्या या प्रकरणाशी संबंधित एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. माहिती मिळताच भीरा पोलीस स्टेशनच्या निरीक्षकांनी सुजीतशी संपर्क साधला आणि त्याला पोलीस ठाण्यात येण्यास सांगितलं.
पोलिसांनी तातडीने त्याचा शोध सुरू केला. काही वेळातच पोलीस ठाण्यापासून थोड्या अंतरावर सुजीत बेशुद्धावस्थेत आढळला. पोलिसांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात नेलं, जिथे प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी त्याची गंभीर प्रकृती पाहून त्याला लखनौला रेफर केलं. मात्र रुग्णवाहिकेतून लखनौला नेत असताना रस्त्यातच सुजीतचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. सुजीतच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रेयसी रुबी आणि तिच्या दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.