घाटकोपर - अंधेरी लिंक रोडवर भीषण अपघात; बाप - लेकाचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2019 20:42 IST2019-01-17T20:41:34+5:302019-01-17T20:42:28+5:30

ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एक शाळेत जाणारा लहान मुलगा आणि एका पुरुषाचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त जमावाने रस्ता रोको केला आणि ट्रक चालकाला पोलिसांच्या हवाली दिले आहे. 

Ghatkopar - Fatal accidents on the Andheri Link Road; Death of both | घाटकोपर - अंधेरी लिंक रोडवर भीषण अपघात; बाप - लेकाचा मृत्यू 

घाटकोपर - अंधेरी लिंक रोडवर भीषण अपघात; बाप - लेकाचा मृत्यू 

ठळक मुद्देया अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर संतप्त नागरिकांनी रस्ता रोको सुरू केला.प्रवाश्यांनी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी श्रेयस सिग्नलकडे येण्यासाठी किंवा पूर्व द्रुतगती मार्गाकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग वापरावे. 

मुंबई - घाटकोपर - अंधेरी लिंक रोडवर लक्ष्मी नगर परिसरात आज भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. दुर्दैवी गोष्ट म्हणजे या भीषण अपघातात बाप लेकाचा जागीच मृत्यू झाला आहे. मोहम्मद रजा जमील सय्यद (७) आणि मोहम्मद जमेल बशीर सय्यद (३५) अशी मृतांची नावं आहेत. त्यानंतर संतप्त नागरिकांनी रस्ता रोको सुरू केला. त्यामुळे या मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. प्रवाश्यांनी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी श्रेयस सिग्नलकडे येण्यासाठी किंवा पूर्व द्रुतगती मार्गाकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग वापरावे. 

ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एक शाळेत जाणारा लहान मुलगा आणि एका पुरुषाचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त जमावाने रस्ता रोको केला आणि ट्रक चालकाला पोलिसांच्या हवाली दिले आहे.  घाटकोपर - अंधेरी लिंक रोडवरील आंदोलकांना बाजूला काढण्यात पोलिसांना यश आलं असून सर्व आंदोलक पंतनगर पोलीस ठाण्यात गेले आहेत. 

Web Title: Ghatkopar - Fatal accidents on the Andheri Link Road; Death of both

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.