घाटकोपर विमान दुर्घटना :मृतांच्या नातेवाईकांची कंपनीविरोधात पोलिसात धाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2019 18:50 IST2019-01-05T18:47:13+5:302019-01-05T18:50:08+5:30
नातेवाईकांनी लेखी तक्रार अर्ज दाखल केला. विमान दुर्घटना घाटकोपर परिसरात घडल्यामुळे तक्रार अर्ज घाटकोपर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

घाटकोपर विमान दुर्घटना :मृतांच्या नातेवाईकांची कंपनीविरोधात पोलिसात धाव
मुंबई - घाटकोपरविमान दुर्घटनेप्रकरणी कंपनीविरोधात कारवाई करावी. यासाठी मृत कर्मचाऱ्यांच्या नातलगांनी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात धाव घेतली. नातेवाईकांनी लेखी तक्रार अर्ज दाखल केला. विमान दुर्घटना घाटकोपर परिसरात घडल्यामुळे तक्रार अर्ज घाटकोपर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
गेल्या वर्षी 29 जूनला घाटकोपर येथे विमान दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत विमानाचे कॅप्टनसह इंजिनीअरिंगचे काम करणाऱ्या पाच जणांचा मृत्यू झाला होता. अपघातग्रस्त विमानाची दुरुस्ती करण्यात आली होती. दुरुस्ती झाल्यानंतर चाचणीदरम्यान विमानाने हवेत उड्डाण केले होते. त्यावेळी घाटकोपर येथील बांधकामाधीन इमारतीच्या साईटवर ते विमान कोसळले होते. दुर्घटनेला संबधित कंपनी जबाबदार असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. त्यामुळे कंपनीविरोधात कारवाई करावी, असे मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे. नुकतेच दुर्घटग्रस्त विमान हे भंगार असल्याचे चौकशी अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे.