घणसोलीतील प्रकार : पॅराशूटमधून उतरलेल्या महिलेचे गूढ मात्र कायम
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 20:49 IST2019-02-05T20:45:16+5:302019-02-05T20:49:41+5:30
खेळ म्हणून पॅराशूट उडवल्याची शक्यता

घणसोलीतील प्रकार : पॅराशूटमधून उतरलेल्या महिलेचे गूढ मात्र कायम
नवी मुंबई - संशयास्पद पॅराशुट मधून महिला उतरल्याचा प्रकार शनिवारी रात्री घणसोलीत घडला. या प्रकारामुळे परिसरात दहशतवादी उतरल्याच्या शक्यतेने भिती व्यक्त होत आहे. मात्र, धाडसी खेळ म्हणून प्रशिक्षित महिलेने इमारतीवरुन पॅराशुटद्वारे उड्डाण केल्याची शक्यता पोलीसांनी वर्तवली आहे.
घणसोली सेक्टर 15 येथील पामबीच मार्गागत शनिवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला होता. काही प्रत्यक्षदर्शीनी परिसरात पॅराशुट उडताना पाहुण पोलीसांना माहिती दिली होती. त्यानुसार शनिवारी रात्री व रविवारी दिवसभर पोलीसांनी परिसराची झडाझडती घेतली. यावेळी एका महिलेसह दोन तरुनांनी पॅराशुट पाहिल्याचे पोलीसांना सांगितले. तर एका तरुणाने पॅराशुटमधून उतरलेल्या महिलेकडे चौकशी देखिल केली होती. यावेळी तिने स्पोर्ट अॅक्टीव्हीटी म्हणून आपण पॅराशुट उडवल्याचे सांगुन साथीदारासह निघून गेली. यावरुन पोलीसांनीही ते संशयीत पॅराशुट खेळ म्हणुन उडवले गेल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्याची खात्री पटवण्याकरिता
लोणावळा व मुंबईतील काही पॅराशुट उड्डाण शिकवणाऱ्या संस्थांशी देखिल संपर्क साधला आहे. त्यापैकी काहींनी घटनास्थळी पाहणी करुन खेळ म्हणूनच त्याठिकाणावरुन पॅराशुटद्वारे महिलेने उडी टाकली असल्याची शक्यता वर्तवली आहे. त्यानुसार श्री समर्थ हाईट या बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या छतावर आढळलेले अनोळखी पायाचे ठसे त्याच महिलेच्या बुटाचे असावेत अशीही शक्यता वर्तवली जात आहे. सदर विदेशी महिलेविषयी पोलीसांना कसलीही माहिती मिळू शकलेली नाही. मात्र सदर विदेशी महिलेने साहसी खेळ म्हणून त्याठिकाणावरुन उडी टाकली असेल, तर हा प्रयत्न तिच्या जिवावर देखील बेतू शकला असता. इमारतींच्या ज्या दिशेने हे पॅराशुट उडत होते, त्याच्या विरुध्द दिशेने हवेचा वेग असल्याने पॅराशुट स्कायलार्क इमारतीच्या अगदी जवळून गेले. याचवेळी त्या इमारतीच्या 19 व्या मजल्यावरील महिलेने हे पॅराशुट खिडकीतुन पाहिले होते. त्यानुसार सदर महिलेचा शोध सुरु असुन इतरही दृष्टीकोनातुन या प्रकरणाचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलीस उपआयुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी सांगितले.
घणसोलीतील प्रकार : अज्ञात पॅराशूटमुळे खळबळ