गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पती अनंत गर्जेंना २७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी, काल झालेली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 16:00 IST2025-11-24T15:53:03+5:302025-11-24T16:00:38+5:30

Anant Garje Police Custody, Gauri Palve Case: कुटुंबीयांनी अनंत गर्जेंवर केलेत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे आरोप

Gauri Palve Garje death case Husband Anant Garje remanded in police custody till November 27 who arrested yesterday | गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पती अनंत गर्जेंना २७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी, काल झालेली अटक

गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पती अनंत गर्जेंना २७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी, काल झालेली अटक

Anant Garje Police Custody, Gauri Palve Case: राज्याच्या कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय्य सहायक अनंत गर्जे यांची पत्नी डॉक्टर गौरी पालवे यांनी गळफास घेऊन आत्महत्या (gauri palve garje death case) केली. या प्रकरणी अनंत गर्जेंना काल रात्री अटक करण्यात आली. आज त्यांना कोर्टात हजर केल्यानंतर, ४ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. अनंत गर्जेंची पत्नी गौरी हिने मुंबईतील राहत्या घरात आत्महत्या केली. अवघ्या काही महिन्यांपूर्वीच या दोघांचा विवाह झाला होता. मुलीच्या आत्महत्येनंतर गौरीच्या कुटुंबीयांनी अनंत गर्जेंवर गंभीर आरोप केले. त्यामुळे कुटुंबीयांच्या तक्रारीवरून अनंत गर्जेंवर गुन्हा दाखल करून अटक केली होती.

मध्यरात्री वरळी पोलिसांकडून अटक

अनंत गर्जे यांना रात्री उशिरा अटक करण्यात आली. अटकेनंतर त्यांना वरळी पोलिस स्थानकात ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, आज त्यांना कोर्टात हजर केले जाणार आहे. अनंत गर्जेंच्या पत्नी गौरी पालवे-गर्जे यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप गौरीच्या कुटुंबीयांनी अनंत गर्जेंवर केला आहे. या प्रकरणी चौकशीसाठी आज अनंत गर्जेंना कोर्टात पोलीस कोठडीसाठी हजर करण्यात आले. कोर्टाने अनंत गर्जेंना २७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या चार दिवसांच्या पोलिस कोठडीच्या चौकशीतून पोलिसांना काय नवी माहिती मिळणार याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.

वरळी पोलीस ठाण्यात कुटुंबीयांनी केलेला आक्रोश

शनिवारी रात्री ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. गौरी पालवे यांच्या कुटुंबीयांनी थेट मुंबईतील वरळी पोलीस ठाणे गाठले आणि अनंत गर्जेंसह त्याच्या कुटुंबीयांवरही हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. कुटुंबीय या प्रकरणी अत्यंत आक्रमक भूमिका घेताना दिसले. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत ते पोलीस ठाण्यातून हलण्यास तयार नव्हते. अखेर पोलिसांच्या त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून घेतला.

Web Title : गौरी पालवे मृत्यु: पति अनंत गर्जे पुलिस हिरासत में

Web Summary : मंत्री पंकजा मुंडे के सहायक अनंत गर्जे, गौरी पालवे आत्महत्या मामले में गिरफ्तार। गौरी के परिवार ने हत्या का आरोप लगाया, जिसके बाद अनंत को गिरफ्तार कर चार दिन की पुलिस हिरासत में भेज दिया गया। परिवार ने हत्या का मामला दर्ज करने की मांग की।

Web Title : Gauri Palve Death: Husband Anant Garje in Police Custody

Web Summary : Anant Garje, aide to minister Pankaja Munde, arrested in Gauri Palve's suicide case. Gauri's family alleged foul play, leading to Anant's arrest and subsequent four-day police custody. The family protested, demanding murder charges.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.