जयपूर - राजस्थानची राजधानी जयपूरमधून एक लाजीरवाणी घटना समोर आली आहे. येथे एक रुग्णवाहिका चालक आणि त्याच्या साथीदाराने जेवण देण्याच्या नावाखाली एका महिलेवर सामूहिक बलात्कार केला. हे प्रकरण 24 मेचे आहे. याबाबत जयपूरमधील मोतीडूंगरी पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णवाहिकेच्या ड्रायव्हरने जेवण देण्याच्या नावाखाली एका महिलेला अॅम्ब्युलन्समध्ये बसवले आणि नंतरत्याने अर्ध्या रस्त्यात आपल्या मित्राला बोलावले. यानंतर या दोघांनी गांधी सर्कल येथून झालाना रोडवर महिलेबरोबर दिवसाढवळ्या असभय वर्तन केले. गुन्हा दाखल करून पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा तपास गांधीनगरचे एसीपी राजवीर सिंह करीत आहेत. रुग्णवाहिका देखील पोलिसांनी जप्त केली आहे.
जेवण देण्याच्या बहाण्यानं रुग्णवाहिकेतच महिलेवर गँगरेप; जयपूरमधील लाजिरवाणा प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 13:41 IST
Gangrape Case : याबाबत जयपूरमधील मोतीडूंगरी पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
जेवण देण्याच्या बहाण्यानं रुग्णवाहिकेतच महिलेवर गँगरेप; जयपूरमधील लाजिरवाणा प्रकार
ठळक मुद्देरुग्णवाहिकेच्या ड्रायव्हरने जेवण देण्याच्या नावाखाली एका महिलेला अॅम्ब्युलन्समध्ये बसवले आणि नंतरत्याने अर्ध्या रस्त्यात आपल्या मित्राला बोलावले.या प्रकरणाचा तपास गांधीनगरचे एसीपी राजवीर सिंह करीत आहेत. रुग्णवाहिका देखील पोलिसांनी जप्त केली आहे.