जंगलात खेचत नेऊन केला गँगरेप; नंतर दगडाने ठेचून केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2021 22:03 IST2021-12-26T22:02:34+5:302021-12-26T22:03:17+5:30
Gangrape Case : तीन हैवानांनी आधी या तरुणीवर बलात्कार केला आणि नंतर तिची गळा आवळून हत्या केली. विरोध केल्यावर त्यांनी अल्पवयीन मुलाच्या शरीराचे लचके तोडले.

जंगलात खेचत नेऊन केला गँगरेप; नंतर दगडाने ठेचून केली हत्या
राजस्थानच्या बुंदी येथे एका १५ वर्षीय आदिवासी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. नातेवाइकांनी शोध घेतला असता मुलीचा मृतदेह जंगलात आढळून आला. याप्रकरणी तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
तीन हैवानांनी आधी या तरुणीवर बलात्कार केला आणि नंतर तिची गळा आवळून हत्या केली. विरोध केल्यावर त्यांनी अल्पवयीन मुलाच्या शरीराचे लचके तोडले. अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींपैकी एक अल्पवयीन आहे. अवघ्या 12 तासात हे प्रकरण उघड झाल्यानंतर पोलिसांनी बलात्कार आणि खुनाचा गुन्हा दाखल केला. ही घटना बुंदी जिल्ह्यातील बसोली पोलीस स्टेशन हद्दीतील काला कुआन गावातील आहे. याठिकाणी तीन नराधमांनी १५ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिला जंगलात नेले आणि तेथून पलटवारपणे सामूहिक बलात्काराची घटना घडवून प्रथम तिचा गळा आवळून तिचे डोकं दगडाने ठेचले. त्यांनी मुलीला ओढत जंगलात नेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
कुटुंबीयांनी मुलीचा शोध सुरू केला, तेव्हा येथील जंगलातून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज आल्याचे गावातील एका महिलेने सांगितले. मुलीच्या वडिलांनी शोध घेतला असता त्यांना पीडितेचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळून आला.
या संपूर्ण घटनेची पोलिसांना माहिती मिळताच बसोली पोलीस स्टेशन घटनास्थळी पोहोचले व वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. पोलीस अधीक्षक जय यादव यांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षकांसह घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. एफएसएल टीम आणि श्वान पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. श्वान पथकाच्या मदतीने आरोपींची ओळख पटली.
पोलिसांना माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी पोहोचलो आणि मृत मुलीचा मृतदेह कापडाने झाकून घेतला. शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला आहे. येथे आज नातेवाईकांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करून मृत मुलीचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. कुटुंबाच्या मागणीनुसार, प्रशासनाने मनरेगामध्ये 500000 च्या आर्थिक मदतीसह रोजगाराचे आश्वासनही दिले आहे.