२ बहिणींवर सामूहिक बलात्कार, फोन करून हॉटेलमध्ये बोलावून घडवून आणलं दुष्कर्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 14:12 IST2022-07-07T13:58:04+5:302022-07-07T14:12:57+5:30

Gangrape Case : सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपींच्या शोधात छापेमारी सुरू आहे.

Gang rape of 2 sisters, calling them to a hotel and committing atrocities | २ बहिणींवर सामूहिक बलात्कार, फोन करून हॉटेलमध्ये बोलावून घडवून आणलं दुष्कर्म

२ बहिणींवर सामूहिक बलात्कार, फोन करून हॉटेलमध्ये बोलावून घडवून आणलं दुष्कर्म

अरवाल : बिहारच्या अरवालमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. जिल्ह्यात २ बहिणींवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. दोन्ही अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. गँगरेप पीडितेने सांगितले की, ३ आरोपींनी बलात्कार केला आहे. तिला आधी गावातून शहरात फोन करून बोलावून मग हॉटेलमध्ये राहण्याची सोय करण्यात आली. तिघांनी हॉटेलच्या खोलीतच आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप पीडित दोघींनी केला आहे. दोन्ही अल्पवयीन बहिणींनी पोलिसांना माहिती दिली. सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपींच्या शोधात छापेमारी सुरू आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, अरवाल शहरातील एका निवासी भागात 2 मुलींवर 3 मुलांनी सामूहिक बलात्कार केला. याबाबतची माहिती मिळताच पोलीस आरोपींच्या अटकेसाठी अनेक ठिकाणी छापे टाकत आहेत. दोन्ही अल्पवयीन बहिणी नात्यात बहिणी असल्याचं समजतं. पीडित महिलांनी सांगितले की, त्यांना शहरात बोलावण्यात आले आणि तिन्ही आरोपी त्यांना एका हॉटेलमध्ये घेऊन गेले. हॉटेलमध्येच त्याच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. पीडित मुलींनी बुधवारी रात्रीच महिला ठाणे गाठून पोलिसांत तक्रार दिलीपोलीस. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपींच्या अटकेसाठी अनेक ठिकाणी छापेही टाकले. मात्र, अद्याप आरोपींना अटक झालेली नाही.

संशयावरून प्रेयसीची हत्या करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रियकराला जन्मठेपच

Read in English

Web Title: Gang rape of 2 sisters, calling them to a hotel and committing atrocities