अनेकवेळा सामूहिक बलात्कार, गर्भवती राहिल्यानंतर जिवंत पुरण्याचा प्रयत्न; मठातील दोघांचे राक्षसी कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 16:27 IST2025-07-25T16:26:16+5:302025-07-25T16:27:22+5:30
Minor Girl Gangraped: मठात काम करणाऱ्या दोघांनी त्यांच्या एका मित्रासह एका अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा सामूहिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.

अनेकवेळा सामूहिक बलात्कार, गर्भवती राहिल्यानंतर जिवंत पुरण्याचा प्रयत्न; मठातील दोघांचे राक्षसी कृत्य
Crime news Latest: एक संतापजनक घटना समोर आली. एका अल्पवयीन मुलीवर तीन जणांनी अनेकवेळा सामूहिक बलात्कार केला. त्यामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिली. याबद्दल आरोपींना कळल्यानंतर त्यांनी त्या मुलीला जिवंतच पुरण्याचा प्रयत्न केला. ही घटना उजेडात आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन जणांना बेड्या ठोकल्या.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आडिशातील जगतसिंहपूरमध्ये ही घटना घडली आहे. सामूहिक बलात्कार करणाऱ्या तीन आरोपींपैकी दोघे भाऊ असल्याचे पोलिसांनी सांगितले. भाग्यधर दास आणि पंचानन दास अशी आरोपींची नावे आहे. तिसरा आरोपी फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
मठात काम करायचे, अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा सामूहिक बलात्कार
पोलिसांनी सांगितले की, आरोपी बनशबारा गावचे रहिवाशी आहेत. भाग्यधर दास आणि पंचानन दास हे दोघे भाऊ आहेत. त्यांनी तुलू बाबू याच्यासोबत मिळून अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा सामूहिक बलात्कार केला.
आरोपींकडून करण्यात आलेल्या अत्याचारामुळे पीडितेला दिवस गेले. मुलगी गर्भवती असल्याचे कळल्यानंतर आरोपींनी तिला पकडले आणि जिवंत पुरवण्याचा प्रयत्न केला. पण, या प्रकरणाचे बिंग फुटले आणि तिला पुरवण्यापूर्वीच लोक पोहोचले. त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली.
पोलिसांनी मुलीला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तर मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक केली. सध्या कुजंग पोलीस ठाण्याचे पथक तिसऱ्या आरोपीचा शोध घेत आहे.