शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

वाटेत उभे हाेते म्हणून टाेळक्यांनी दाेघांवर तलवारीने केले वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 13:50 IST

वाटेत उभे हाेते म्हणून दाेघांवर टाेळक्यांनी तलवारीने वार केल्याची घटना पुण्यातील काेथरुड भागात घडली अाहे.

पुणे : कोथरुड मधील सुतारदरा परिसरात १० ते १५ जणांच्या टोळक्यांनी तलवार, कोयत्याने दोघांवर वार करुन त्यांना गंभीर जखमी केले असून परिसरातील दुकानांवर दगडफेक करुन दहशत पसरविली़. ही घटना मंगळवारी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत किरण अशोक दुडे (वय २७, रा़ किष्कींदानगर, कोथरुड) आणि संतोष बबन दुडे (वय२५, रा़ दत्तनगर, सुतारदरा, कोथरुड) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.  दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.  याप्रकरणी योगेश गंगाराम साठे (वय २६, रा़ गोळेआळी, सावकारवाडी, पिरगुंट) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी धीरज कुडले, साहिल हळंदे व त्याच्या १० ते १५ साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.

     याबाबत पोलिसांनी सांगितले की, सुतारदरा येथील दत्तनगरमधील दत्तमंदिराजवळ योगेश साठे हे त्यांच्या मित्रांबरोबर गप्पा मारत उभे असताना धीर कुडले, साहिल हळंदे व त्याचे १० ते १५ साथीदार हातामध्ये तलवार व कोयते घेऊन दहशत निर्माण करीत आरडाओरडा करीत  खालच्या दिशेने जात असताना साठे व त्याचे मित्र वाटेत उभे होते. या कारणावरुन त्यांनी शिवीगाळ करीत हातातील तलवार, कोयत्यांनी किरण आणि संतोष यांच्यावर वार केले व त्यांना गंभीर जखमी करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी आजू बाजूच्या दुकानावर दगडफेक करुन दहशत निर्माण केली़ त्यामुळे दुकानदारांनी लगेचच आपली दुकाने बंद केली.      या घटनेची माहिती मिळताच कोथरुड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.  तेथील बंदोबस्त वाढविला असून आरोपींच्या संशयितांचा शोध घेतला जात आहे.  गणेशोत्सव गुरुवारपासून सुरु होत असताना सुतारदऱ्यात पुन्हा एकदा गुन्हेगारांनी आपली दहशत पसरविण्यासाठी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला अाहे.  यापूर्वीही या भागात दोन टोळ्यांमधील मारामारीत नागरिकांची पार्क केलेली वाहने लक्ष्य करण्याचे प्रकार येथे घडले आहेत.  या प्रकाराने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणेkothrudकोथरूडPoliceपोलिस